Rabbi Crop
Rabbi Crop Agrowon
ताज्या बातम्या

Rabbi Crop : रब्बी पिकाला बसणार फटका

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती : रब्बी हंगामास (Rabbi Season) सुरुवात झाली असून खरिपात निराशा झाल्याने रब्बीपासून अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यासमोर पाणी आहे, मात्र वीज नाही ही समस्या तोंड आवासून उभी आहे. वीजपुरवठा सुरळीत व दिवसा द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी असून महावितरणने नियोजन करावे, अशी मागणी केली आहे. मात्र दर वर्षी कायम राहणारी ही समस्या यंदा सुटेल का या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नाही.

यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे नदीकाठच्या व सखल भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जुलै ते ऑक्टोबर दरम्यानच्या पावसाने धरणांसह शेतातील विहिरी व भूगर्भातील पाणीपातळी वाढल्याने यंदा सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढू या आशेवर शेतकरी रब्बीच्या हंगामासाठी कामाला लागला आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण असून शेतांची मशागत करून शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. खरिपात सोयाबीनखाली जिल्ह्यातील अडीच लाख हेक्टरवर क्षेत्र पेरणीखाली होते. रब्बीत या क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. धरणांमधून पाच ते सात पाळ्या सिंचनासाठी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. परंतु वीजपुरवठा सुरळीत व नियमित नसल्याने यंदा ही समस्या कायम आहे, असे शेतकऱ्यांचे आक्षेप आहेत. शासनाने सिंचनाच्या सुविधा केल्या असल्या तरी त्या प्रमाणात विजेचे नियोजन केलेले नाही. त्यामुळे दरवर्षी रब्बी हंगामात विजेचा तुटवडा जातो. सध्याही सिंचनासाठी रात्रीतून वीजपुरवठा करण्यात येत आहे. थंडीचे दिवस आहेत. शेत ओली असतात, तापमान १५ अंशांपेक्षा कमी होते, अशा स्थितीत शेतकऱ्यांना रात्रीतून सिंचनासाठी जावे लागते. कधी कधी वीजपुरवठा सुरळीत नसतो, खंडित राहतो, कमी पुरवठा होतो अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. महावितरण नियोजन करीत नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. रब्बी हंगामाकरिता दिवसा व नियमित वीजपुरवठा करावा व नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

Sharad Joshi : शरद जोशींचा अंगारमळा लवकरच इतिहास जमा होईल...

Kharif Season : खते, बी-बियाणे वेळेत उपलब्ध करा

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

SCROLL FOR NEXT