Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : रब्बीत पीककर्जाचा टक्का घसरला

१६ टक्के कर्जवाटप; सहा हजार शेतकऱ्यांनी घेतले कर्ज

Team Agrowon

अमरावती : रब्बी हंगामातील पेरणी जवळपास आटोपत आली असून, या वर्षी पीककर्जाचा टक्का घसरल्याचे दिसून येऊ लागले आहे. रब्बी हंगामात या वर्षी एकूण कर्जवाटप लक्ष्यांकापैकी १६ टक्के रक्कम कर्जवाटप आतापर्यंत झाले असून, गतवर्षी हीच टक्केवारी २४ इतकी होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेने यंदाही रब्बी हंगामात कर्जवाटप केलेले नाही.

जिल्ह्यात रब्बी हंगामात या वर्षी ९४ टक्के पेरणी आटोपली आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आता रब्बी हंगामाकडून अपेक्षा केल्या आहेत. या हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता राष्ट्रीय व खासगी बँकांनी कर्जवाटप केले आहे. त्यासाठी ४५० कोटी रुपयांचे लक्ष्यांक निश्‍चित करण्यात आले होते. त्या तुलनेत या वर्षी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फारच कमी आहे. खरिपात कर्ज घेतल्याने अनेकांना रब्बीत कर्ज घेणे जमत नाही. त्याचा परिणाम पडल्याचे बँकांचे म्हणणे आहे.

या वर्षी रब्बी हंगामासाठी ८७ हजार सभासद शेतकऱ्यांसाठी ४५० कोटीचे लक्ष्यांक निश्‍चित करण्यात आले असले, तरी ५९३२ शेतकऱ्यांनीच पीककर्ज घेतले आहे. एकूण ७ कोटी ५ लाख रुपये कर्जवाटप करण्यात आले असून, एकूण लक्ष्यांकाच्या ती १६ टक्के आहे.

राष्ट्रीय बँकांनी ३० हजार सभासदांसाठी ३२६ कोटी २४ लाख रुपयांचे लक्ष्यांक निर्धारित केले होते. त्यापैकी ५५७१ शेतकऱ्यांनी ६ कोटी ९१ लाख, खासगी बँकांकडून ३४९ सभासदांनी ८ लाख ३४ हजार व ग्रामीण बँकेकडून १२ सभासदांनी २६ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Issue: पावसाचा अडीचा डाव; पेरण्याही हिरमुसल्या

Maharashtra Rain: पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

SCROLL FOR NEXT