Chandrakant Patil
Chandrakant Patil Agrowon
ताज्या बातम्या

Chandrakant Patil : महसूल विभागाची कार्यालये सुसज्ज असणे गरजेचे

Team Agrowon

पुणे : जीएसटी (GST) प्रमाणेच महसूल विभाग (Revenue Department) हा राज्याला उत्पन्न मिळवून देणारा विभाग असल्याने महसूल विभागाची कार्यालये सुसज्ज आणि अद्ययावत असणे गरजेचे आहे, असे‌ प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी केले.‌

जुन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी ते सोमवारी (ता. १९) बोलत होते. यावेळी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर,नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड, दीपक सोनावणे, अधिक्षक अभियंता बी. एन. बहिर, उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, कार्यकारी अभियंता  आर. वाय. पाटील, पुणे ग्रामीणचे सह जिल्हा निबंधक दीपक पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, माजी जिल्हा परिषद
सदस्या आशा बुचके आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, की देशाला जीएसटीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. त्याप्रमाणे महसूल विभागाच्या माध्यमातून राज्याला उत्पन्न मिळते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महसूल विभागाची कार्यालये अद्ययावत आणि सर्व सोईसुविधांनी सुसज्ज असावीत यावर भर दिला होता.

त्यानुसार राज्यातील अनेक कार्यालये अद्ययावत करण्यात आली. जुन्नर तालुक्यातील उपनिबंधक कार्यालयदेखील अद्ययावत करण्यात येत आहे. लवकरात लवकर ही इमारत उभी राहून, त्याचे लोकार्पण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर म्हणाले, की जुन्नर ही ऐतिहासिक भूमी आहे. येथील महसूल कार्यालयात सर्वाधिक जुन्या नोंदी आहेत.

त्यामुळे हे कार्यालय अद्ययावत होणे गरजेचे होते. हे काम लवकरात लवकर पूर्ण करुन, कार्यालय कार्यान्वित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT