Sitafal Agrowon
ताज्या बातम्या

सीताफळ प्रक्रिया उद्योगावर लक्ष केंद्रित करण्याची गरजः डॉ. विलास भाले

यापुढील काळात सीताफळावर प्रक्रिया करून विविध पदार्थ कसे बनवता येतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे झाले तर उत्पादकाला शाश्वती मिळेल.

अॅग्रोवन वृत्तसेवा

अकोला ः सीताफळाचे दर्जेदार उत्पादन काढतानाच प्रक्रिया उद्योगावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे झाले आहे. सीताफळ उत्पादन वाढवताना खर्च कमी करा. कीड येण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवता आले पाहिजे. सीताफळ उत्पादन घेताना सेंद्रिय घटकांचा वापर वाढवावा, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी दिला.

सीताफळ महासंघ (पुणे), कृषी विभाग व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. 15) कृषी विद्यापीठाच्या कमेटी सभागृहात झालेल्या राज्यस्तरीय सीताफळ कार्यशाळेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणून कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांतप्पा खोत, सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी, सचिव अनिल बोंडे, माजी आमदार कृष्णराव इंगळे आदी उपस्थित होते.

डॉ. भाले म्हणाले, की सीताफळ हे नाशवंत प्रकारातील फळ ओळखले जाते. आज या फळाच्या उत्पादनातून अनेक शेतकरी चांगले पैसे मिळवत आहेत. आपण यापुढील काळात सीताफळावर प्रक्रिया करून विविध पदार्थ कसे बनवता येतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे झाले तर उत्पादकाला शाश्वती मिळेल. सीताफळाच्या गरापासून काही पदार्थ बनवले जात आहेत. अधिकाधिक खाद्यपदार्थ, पेयात सीताफळाचा वापर वाढला तर आपल्याला अधिक फायदा होईल. आज विद्यापीठाने आपल्या संशोधनाची दिशा बदलून शेती ते लॅब असे धोरण यांनी सविस्तरपणे सीताफळ या पिकाबाबत मांडणी केली.

श्याम गट्टाणी यांनी प्रास्ताविकात सीताफळ महासंघाची वाटचाल मांडतानाच राज्यात कसे काम सुरू आहे, याचा आढावा घेतला. सीताफळाची सध्याची स्थिती, उत्पादकांसमोरील संधी, अडचणीबाबत ऊहापोह केला. सीताफळाचे नेमके क्षेत्र किती आहे, याची आकडेवारी कृषी खात्याने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. कार्यक्रमात सीताफळापासून तयार केलेल्या विविध थंडपेयांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

तांत्रिक सत्रात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. शशांक भराड यांनी सादरीकरण करीत सविस्तरपणे मांडणी केली. याशिवाय विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. गोविंद जाधव, डॉ. बाळकृष्ण जडे, शेतकरी विनय बोथरा आदींनी सीताफळ पिकाबाबत विविध विषयांवर मांडणी केली. कार्यशाळेसाठी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. राज्यभरातून शेकडोंच्या संख्येने उत्पादक कार्यशाळेला उपस्थित होते.

सीताफळाच्या क्षेत्राची माहिती देणार ः खोत

डॉ. खोत यांनी जिल्ह्यात सीताफळाचे लागवड क्षेत्र किती आहे, याची माहिती १५ दिवसांत उपलब्ध करून देण्याबाबत आश्‍वासन दिले. सीताफळाच्या लागवड, उत्पादन वाढीसाठी कृषी विभाग सातत्याने सहकार्य करेल, संशोधनपर मोहिमेतही आपली भूमिका सातत्याने बजावेल, असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bacchu Kadu Protest : बच्चू कडू यांचे 'रेल रोको आंदोलन' रद्द; न्यायालयात लेखी हमीपत्र सादर

Rabi Season: अमरावती जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर रब्बी हंगाम

Banana Cultivation: खतांचा समतोल वापर करून मिळवा केळीचे अधिक उत्पादन!

Ujani Dam Discharge: उजनी धरणातून शेतीसाठी यंदा तीन आवर्तने सोडणार

Crop Damage: मॉन्सूनोत्तर पावसामुळे उरल्यासुरल्या पिकांची नासाडी

SCROLL FOR NEXT