Mango Agrowon
ताज्या बातम्या

Mango Season : आंबा हंगाम अंतिम टप्प्यात

Mango season Update सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असून आंब्याचा तुटवडा असल्यामुळे पेटीचा दर साडेतीन ते चार हजारांवर स्थिर राहिला आहे.

Team Agrowon

Mango Market Update : जिल्ह्यातील आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असून आंब्याचा तुटवडा असल्यामुळे पेटीचा दर साडेतीन ते चार हजारांवर स्थिर राहिला आहे. तर कॅनिंगच्या आंब्याचा दर देखील प्रतिकिलो ६० रुपये आहे. पूर्व पट्ट्यातील आंबा अजूनही बाजारपेठेत आलेला नाही.

जिल्ह्यात यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून किरकोळ आंबा बाजारपेठेत येऊ लागला. पहिल्या टप्प्यातील आंब्याची आवक मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर वाढली. त्यावेळी साडेचार हजारांपर्यंत पेटीचा दर होता.

तर देवगड हापूसकरिता ओळखल्या जाणाऱ्या देवगड बाजारपेठेत प्रतिडझन १ हजार ते १२०० रुपये दर होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील आंबा बाजारपेठेत आला. याचवेळी जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

तिसऱ्या टप्प्यातील मोहोराचे प्रचंड नुकसान झाले.त्यामुळे मे मध्ये येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील आवक कमी झाली. सध्या अतिशय किरकोळ स्वरुपातील आंबा बाजारपेठेत येत आहे. मे च्या दुसऱ्या आठवड्यात पूर्व पट्ट्यातील आंबा बाजारपेठेत येतो.त्या कालावधीत आंब्याचे दर काहीसे कमी होतात.

परंतु पूर्व पट्ट्यातील आंबाच अजूनही बाजारपेठेत न आल्यामुळे आणि देवगड परिसरातील आंब्याची आवक कमी असल्याने आंब्याचे दर आजही प्रतिपेटी साडेतीन ते चार हजारांवरच टिकून आहेत.

आंब्याचा तुटवडा जाणवत असल्याने कॅनिंग व्यवसायाला आंबा मिळेनासे झाला आहे. कॅनिंगचा दर प्रतिकिलो ६० रुपये दर आहे.

दरम्यान यावर्षीचा आंबा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या १५ ते २० मे नंतर आंबा मिळणे मुश्कील होणार आहे. जिल्ह्यात सध्या पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे सध्या आंब्याला मोठी मागणी दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dhananjay Munde: मंत्रिपद गेले तरी धनंजय मुंढेंचा सरकारी बंगल्यावर ताबा; भुजबळांना मिळेना बंगला

Lumpy Skin Disease : औसा तालुक्यातील चार गावांत ‘लम्पी’

Latur Water Stock : लातूर जिल्ह्यात केवळ २९ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Rural Housing Scheme : घरकुलांच्या उद्दिष्टपूर्तीत दिरंगाई नको ः प्रकाश आबिटकर

Wild Boar Crop Damage : रानडुकरांकडून मक्याचा फडशा

SCROLL FOR NEXT