Elephant  Agrowon
ताज्या बातम्या

हत्तीचा कळप मोर्लेत दाखल; फणस, केळी बागांचे नुकसान

तिलारी खोऱ्यातील हत्तींचा कळप आता मोर्लेत (ता. दोडामार्ग) दाखल झाले असून हत्तींनी फणस, केळी बागा, भेडले माड आदींचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः तिलारी खोऱ्यातील हत्तींचा कळप आता मोर्लेत (ता. दोडामार्ग) दाखल झाले असून हत्तींनी फणस, केळी बागा, भेडले माड आदींचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे.

हत्तीचा एक कळप गेल्या काही दिवसांपासून तिलारी धरण परिसरात होता. धरणाचे मुबलक पाणी आणि खाद्यांची व्यवस्था यामुळे या भागातील घाटीवडे, बांबर्डे भागांत हत्तीचे अधिक काळ वास्तव्य असते. गेल्या काही दिवसांपासून याच भागात हत्तीच्या कळपाचा वावर होता. परंतु आता या कळपाने आपला मुक्काम हलविला आहे. दोन दिवसांपूर्वी हत्ती मोर्लेत दाखल झाले आहेत.

दाखल होताच हत्तींच्या कळपाने केळी, फणस, कवाथे, भेडले माड, आदींवर ताव मारण्यास सुरुवात केली आहे. मोर्ले परिसरात हत्तींचा कळप आल्यामुळे लोक सावधगिरी बाळगत आहेत. हत्तींच्या कळपावर वनविभाग लक्ष ठेवून असतो. सायंकाळच्या वेळी हत्ती वस्तीत येण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असते. या भागात हत्ती अधिक काळ वास्तव्य करीत नाही, असे सांगितले जाते. मोर्लेनंतर या परिसरातील केर, सोलावल, पाळये, घोटगेवाडी, मेंढे या परिसरात हत्ती जाण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

VBG-Ram-ji: ग्रामीण रोजगाराच्या हमीची ऐशी-तैशी

Indian Political Challenges: राहुल गांधी आणि ‘सीजेपी’चे सरकारपुढे आव्हान

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

SCROLL FOR NEXT