Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : किमान तापमानातील घट कायम

नोव्हेंबर महिन्यात देशाच्या अनेक भागांत किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहील असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला.

टीम ॲग्रोवन

पुणेः नोव्हेंबर महिन्यात देशाच्या अनेक भागांत किमान तापमान सरासरी (Normal Temperature) ते सरासरीपेक्षा अधिक राहील असा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) जाहीर केला. राज्यात आज अनेक भागातील किमान तापमान कमी झाले होते. तर काही ठिकाणी तापमानात वाढ झाली होती.

नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी राहण्याची, तसेच महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले. देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरीपेक्षा वर राहण्याची शक्यता अधिक आहे.

तर देशाचा वायव्य भाग आणि हिमालय पर्वताच्या पायथ्याकडील भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. पुढील महिनाभरात देशाच्या बहुतांशी भागात कमाल तापमान मात्र सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे.

मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे सर्वात कमी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगावातील किमान तापमानात आज १.७ अंश सेल्सिअसने घट झाली होती. तर नाशिक येथे १२.६ अंश सेल्सिअस किमान तापमान होते.

तर कोल्हापुरात सर्वात जास्त १९.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. मराठवाड्यातील नांदेड येथे १४.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर कमाल १८.६ अंश सेल्सिअस तापमान नांदेड येथे होते.

विदर्भात आजही किमान तापमान काहीसे जास्त होते. यवतमाळ येथे सर्वात कमी १४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर सर्वाधिक किमान तापमान ब्रम्हपुरी येथे १८.५ अंश सेल्सिअसवर पोचले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cooperative Education Fund: सहकार शिक्षण निधी महिनाभरात पुन्हा सुरू करणार : मुख्यमंत्री

Farmer Fraud: सोलापुरात शेतकऱ्याची १२ लाखांची फसवणूक

Fruit Crop Insurance: फळपीक विमा योजनेत नारळ, सुपारीचा समावेश

Maharashtra Rain: राज्यात ३०८ मंडलांत अतिवृष्टी

Shaktipeeth Highway Issue: आषाढीला पंढरपुरात ‘सद्‍बुद्धी दिंडी’; शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT