camels arrived in Nashik agrowon
ताज्या बातम्या

Rescue camels : नाशिकमध्ये आलेल्या उंटांची होणार ‘घरवापसी’; प्रशासनासह सामाजिक संस्थांचा पुढाकार

camels arrived in Nashik : नाशिक शहरासह जिल्ह्यात दाखल झालेल्या १५४ उंटांचा जत्था लवकरच मायभूमी राजस्थानच्या दिशेने रवाना होणार आहे.

Team Agrowon

Rescue camels : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात उंटांचे जत्थेच्या जत्थे येऊ लागले. हे उंट अत्यंत अशक्त आणि कुपोषित आहेत. त्याचबरोबर ते नेमके कुठे चाललेत? या सर्व उंटांची मालकी कोणाची? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. त्यामुळे या उंटांना पुन्हा राजस्थानमध्ये पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

नाशिक जिल्हा प्रशासनाला या उंटांची राजस्थानमध्ये सुरक्षित वाहतूक करण्यासाठी लागणारी मदत धरमपूरस्थित श्रीमद राजचंद्र मिशन संस्थेने देण्याची तयारी दर्शविली आहे.

नाशिक जिल्ह्यातील दाखल झालेल्या उंटांपैकी पांजरापोळमध्ये १०९ उंट तसेच मालेगावजवळील गोशाळेत ४३ उंट आश्रयास आहेत. जिल्ह्यात दाखल झालेल्या सर्व उंटांचे पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण केले जाणार आहे. यानंतर सर्वांना टॅगिंग करून त्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे घेतली जाईल, यानंतर उंटांचा राजस्थानच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे.

राजस्थान सरकारशी आम्ही संपर्कात आहोत. नाशिक जिल्ह्यात इतक्या मोठ्या संख्येने उंट कुठून आले. कुठे जात होते, याची सखोल चौकशी करण्याचे पोलीस प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.
दादा भुसे , पालकमंत्री, नाशिक जिल्हा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sediment Measurement Technology: सेन्सर आधारित गाळ मापन तंत्रज्ञान

Sterile Insect Technology: फळमाशीवर मात करण्यासाठी ‘वंध्य कीटक तंत्रज्ञान’

Fodder Cultivation Technology|: सुधारित चारा वाणांसह लागवड तंत्राचाही प्रसार

Maharashtra Drought Situation: नियोजन दुष्काळ निवारण्याचे!

Nepal Natural Disaster: हिमालयाचा इशारा

SCROLL FOR NEXT