Crop Management  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Management : शेती नियोजनातून दुष्काळावर शोधले उत्तर

Baramati News : केंद्रीय मुख्य सचिव आहुजा ः बारामतीत सातव बंधूचे केले कौतूक

Team Agrowon

Satav Brothers Farming : कल्याण पाचांगणे ः सकाळ वृत्तसेवा
माळेगाव, जि. पुणे ः कोरोळी (ता. बारामती) येथील जिरायती भागात शाश्वत शेती (Sustainable Agriculture) करून दाखविण्याची किमया नितीन व सचिन सदाशिव सातव या भावंडांनी केली आहे.

पावसाच्या पाण्याचे शेततळ्याच्या माध्यमातून काटेकोर व्यवस्थापन केले, खत व्यवस्थापनाच्या जोरावर या सातवबंधूंनी कोरोळीच्या रिरायती भागात तब्बल शंभर एकर शेती बागायत केली.

सध्या उन्हाळ्याच्या दिवसात त्या शेतीमध्ये ऊसपिकासह कडधान्य, फळबागा, भाजीपाला आणि सुगंधी वनस्पतीची झालेली लागवड मनाला आनंद देऊन जाते.

शेतकरी विकासाच्या दुष्टीने ही दिशादर्शक ठरलेले शेती थेट केंद्रीय कृषी विभागाचे मुख्य सचिव मनोज आहुजा यांनी नुकतीच पाहिली. ‘‘हा पथदर्शी प्रकल्प आहे.

सातवबंधूनी कष्टाला दूरदूष्टी, अभ्यास आणि शेती नियोजनाची जोड देत दुष्काळावर उत्तर शोधून यश संपादन केले आहे,’’ अशा शब्दात सचिव श्री. आहुज सातव बंधुंचे कौतूक केले.

बारामती तालुक्यातील उत्तरेच्या जिरायती भागाला सातत्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमिवर बहुतांशी जिरायती असलेल्या भागांत पाण्याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

अर्थात तोच विचार करून बारामतीमधील नितीन सदाशिव सातव, सचिन सदाशिव सातव या बंधूंनी कोरोळीसारख्या जिरायती भागात शंभर एकर शेती बागायत केली आहे. त्यांनी कष्टाला दूरदृष्टी, अभ्यास आणि शेती नियोजनाची जोड देत पाणी टंचाईवर उत्तर शोधून यश संपादन केले.

पावसाच्या पाण्याच्या आधारे शेततळे भरून घेतले, त्या शेततळ्याच्या माध्यमातून पाण्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन केले, पाणी व खत व्यवस्थापनासाठी ड्रीप इरिगेशनची ऑटोमेशन सिस्टिम बसवली आणि त्यामुळे सध्या उन्हाळ्यातही येथील शेतीमध्ये ऊसपिकासह कडधान्य, फळबागा, भाजीपाला आणि सुगंधी वनस्पतीची लागवड झाल्याचे पहावयास मिळते.

त्यांचा हा प्रयोग शेतीला उज्ज्वल भवितव्याचा मार्ग दाखविणारा ठरत आहे.

या प्रयोगाची माहिती मिळताच बारामती दौऱ्यावर आलेले केंद्रीय कृषी विभागाचे सचिव मनोज आहुजा यांनी सदरची शेती पाहण्याची इच्छा व्यक्त केली. स्थानिक अधिकाऱ्यांनीही त्यांची इच्छा लागलीच पूर्ण करण्यासाठी गाड्यांचा ताफा कोरोळी गावात पोचविला.

तेथील पाणी व खत व्यवस्थापनाच्या जोरावर कमी खर्चात अधिक शाश्वत शेती होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण संबंधित अधिकाऱ्यांना पहावयास मिळाले.

खडकाळ जमिनीत सुपीकता आणून त्या जमिनीत केवळ तीन वर्षांत उसासारखे नगदी पिके, कडधान्य, फळबागा, भाजीपाला आणि सुगंधी वनस्पती पिके घेण्याचा सातवबंधूनी केला प्रयोग पथदर्शी असल्याचे अधिकारी आहुजा यांनी सांगितले.

या वेळी मुख्य सचिव एकनाथ ढवले, केंद्रीय अतिरिक्त सचिव राकेश रंजन, राज्याचे फलोत्पादन विभागाचे संचालक डाॅ. कैलास मोते, अधिकारी रफिक नाईकवाडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, बारामती कृषी अधिकारी सौ. बांदल माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, माळेगाव कारखान्याचे संचालक अनिल तावरे, तानाजी देवकाते, स्वप्नील जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.



ड्रीप इरिगेशनची ऑटोमेशन सिस्टीममुळे शेती करणे सोयीचे होत आहे. पारंपरिक पिकांपासून सुगंधी वनस्पती लागवडीपर्यंत सर्वकाही पिके हंगामनिहाय घेता येतात.

कोरोळीच्या शिवारात सध्याला ऊस शेतीबरोबर जांभूळ, पपई, सिंधी, विविध प्रकारच्या पालेभाज्या आणि काही सुगंधी वनस्पती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
- नितीन सातव, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Development: कृषी आराखड्यात अधिकारी, कर्मचारी महत्त्वाचा दुवा

Use of BioFertilizers: जमिनीचा कस वाढवणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आणि त्यांचे फायदे

Silk Development: ‘रेशीम विभाग आपल्या दारी’ मोहीम राबवणार

Rural Development: नऊ गावांमध्ये विकासकामांचा दुष्काळ

Rabi Crop Management: शाश्‍वत रब्बी पीक उत्पादनासाठी मृद् व जलसंधारण

SCROLL FOR NEXT