Weather Update
Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : नांदेडला तापमानाचा पारा बारा अंशांवर

Team Agrowon

नांदेड : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपूर्वी तापमानाचा (Temperature) पारा १० अंश सेल्सिअयपर्यंत खाली गेला होता. परंतु यात किंचितशी घट होऊन १२ अंशांवर पारा (Para) गेला आहे. यामुळे थंडी (Cold Weather) कमी झाली असे वाटत असले, तरी ग्रामीण भागांत हुडहुडी कायम आहे.

जिल्ह्यात थंडी जाणवायला सुरू होताच ढगाळ वातावरणात भर पडू लागल्याने थंडीचे प्रमाण कमी होत गेले होते. परंतु मागील तीन-चार दिवसांपासून तापमानाचा पारा सामान्य तापमानापेक्षा खाली आल्याने थंडी वाढली आहे. रविवारी (ता.८) जिल्ह्यातील तापमानाचा पारा १०.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने जिल्ह्याला चांगली हुडहुडी भरली आहे.

सोमवारी (ता. ९) सकाळी साडेआठ वाजता तापमानाचा पारा १०.६ अंश नोंदला गेला होता. यामुळे ग्रामीण भागांत शेकोट्या पेटल्या आहेत. मंगळवारी (ता.११) मात्र तापमानात काही वाढ दिसून आली.

बुधवारी (ता.११) सकाळी साडेआठ वाजता तापमानाचा पारा १२ अंश सेल्सिअस नोंदला गेला. यामुळे थंडीमध्ये किंचितशी घट झाल्याचे जाणवत आहे.

दरम्यान जिल्ह्यात हिवाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात थंडी पडत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवस जिल्ह्याचे तापमान सरासरी तापमानाच्या खाली राहण्याचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT