Gopinath Munde accident insurance Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Subsidy : शेतकरी अनुदान मंजुरीसाठी तहसीलदारांना वेळ मिळेना

Farmer Accident Subsidy Scheme : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून दोन लाखांचे अनुदान देण्यात येते.

Team Agrowon

Nanded News : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून दोन लाखांचे अनुदान देण्यात येते. परंतु हे अनुदान मंजुरीसाठी तहसीलदारांना वेळच मिळत नसल्याने लोहा, उमरी व धर्माबाद तालुक्यांतील प्रस्ताव रखडले आहेत.

शेती व्यवसाय करताना विविध कारणाने शेतकऱ्याचा मृत्यू झाला तसेच कायमचे अपंगत्व आले तर त्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख सानुग्रह अनुदान देण्यात येणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राज्य सरकारने ता. १९ एप्रिल २०२३ रोजी सुरू केली आहे.

ही योजना सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील १६ तालुक्यांतून अनुदानासाठी ६२ प्रस्ताव दाखल झाले. यातील ३१ प्रस्ताव मंजूर, तर पाच प्रस्ताव नामंजूर झाले आहेत. यातील २६ प्रस्तावांपेकी काही प्रस्ताव कागदपत्रांअभावी, तर काही प्रस्ताव तहसीलदारांना वेळ मिळत नसल्याने तालुकास्तरावर पेंडिंग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात लोहा, उमरी व धर्माबाद तहसीलचा समावेश असल्याची माहिती सूत्राने दिली.

शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी तालुकास्तरीय समितीपुढे ठेवले जातात. या समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार, सदस्यपदी गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, तर सदस्य सचिवपदी तालुका कृषी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

योजनेच्या प्रारंभापासून ६२ प्रस्ताव दाखल

यात नांदेड तालुक्यातून तीन प्रस्ताव दाखल झाले होते. यातील एक मंजूर तर दोन कागदपत्रांअभावी पेंडिंग आहेत. अर्धापूर दोनपैकी एक मंजूर एक पेडिंग, मुदखेड दोनपैकी दोन मंजूर, लोहा दाखल तीनपैकी तीनही बैठकीअभावी पेंडिंग, देगलूर पाचपैकी चार मंजूर एक कागदपत्राअभावी पेंडिंग, बिलोली नऊपैकी दोन मंजूर दोन नामंजूर व पाच कागदपत्रांअभावी पेंडिंग, नायगाव तीनपैकी तीन मंजूर, धर्माबाद दोनपैकी दोन बैठकींअभावी पेंडिंग, किनवट एकपैकी एक मंजूर, हिमायतगनर तीनपैकी तीन मंजूर, भोकर आठपैकी सात मंजूर एक पेंडिंग, हदगाव चार दाखल, बैठक झाली पण सध्या चारही पेंडिंग, उमरी बैठकीअभावी पाचपैकी पाच पेंडिंग, कंधार चारपैकी दोन मंजूर एक नामंजूर एक पेंडिंग व मुखेड सहापैकी दोन मंजूर तर चार कागदपत्रांअभावी पेंडिंग.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT