Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविम्यासाठी एकच रुपया घ्यावा : सेवा केंद्रांना सूचना

Crop Insurance Scheme : यावर्षीच्या खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ या ३ वर्षांसाठी पीकविमा घेतला जात आहे. यासाठी केवळ एक रुपया घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी केवळ एक रुपयाच भरावा लागणार आहे. जादा पैसे घेणाऱ्यांची तक्रार तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

पत्रकात म्हटले आहे, की यावर्षीच्या खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ या ३ वर्षांसाठी पीकविमा घेतला जात आहे. यासाठी केवळ एक रुपया घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार सामूहिक सेवा केंद्रधारकाने केवळ एक रुपया भरुन पीकविमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी.

पीकविमा योजनेचे अर्ज भरताना सामूहिक सेवा केंद्राने अतिरिक्त रक्कमेची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी संबंधित पीकविमा योजनेचे कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधवा.

२०२३-२४ पासून सर्वसमावेशक पीकविमा योजना राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे.

पीकविमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्रधारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम ४० रुपये देण्यात येते. परंतु राज्यातील काही सामूहिक सेवा केंद्रधारकांकडून शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी होत आहेत. त्यानुसार हे आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Industry Crisis: साखर उद्योगाला गरज कडू मात्रेची !

Monsoon Heavy Rain: पावसाचे देशभरात १२ बळी

Grape Farming Fund: द्राक्षशेतीला निधी देण्यास आढेवेढे घेणार नाही: उपमुख्यमंत्री पवार

Goat Farming: दोन शेळ्यांच्या बळावर बसविली आर्थिक घड

Snehanvan: ‘स्नेहवन’कडे पाहून जगण्याची उमेद वाढली

SCROLL FOR NEXT