Raju Shetti Manoj Jarange  Agrowon
ताज्या बातम्या

Maratha Reservation Protest : आरक्षणबाबत लवकर निर्णय घ्या : राजू शेट्टी

Raju Shetti Meets Manoj Jarange : अंतरवाली सराटी येथे श्री शेट्टी यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.

Team Agrowon

Jalna News : मराठा समाज हा शेतीवर उदरनिर्वाह करणारा समाज आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे नेहमी अडचणीत सापडत आहे. शैक्षणिक व नोकरीसाठी या समाजाला आरक्षणाची गरज असल्याने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी (ता. ११) अंतरवाली सराटी येथे सांगितले.

अंतरवाली सराटी येथे श्री शेट्टी यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. या वेळी शेट्टी म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करिता आपण खासदार असताना लोकसभेत प्रथम मागणी केली होती. आरक्षणसाठी काही झारीतील शुक्रार्चाय अडचणी आणत आहेत.

राज्यातील व दिल्लीतील नेते मंडळी यांनी आरक्षण कसे लवकर देता येईल, याचा विचार करावा. सोमवारी (ता. ११) सायकांळी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक होत आहे. यामध्ये निर्णय घेऊन आरक्षण ‘जीआर’ (शासन आदेश) काढावा, असे शेट्टी म्हणाले. आरक्षणासाठी जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहनही श्री. राजू शेट्टी यांनी केले.

जरांगे यांचा उपचार घेण्यास नकार

मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण चौदाव्या दिवशीही सुरूच होते. सोमवारी (ता. ११) सकाळी १०.४५ च्या सुमारास डॉ. अतुल तांदळे व सहकारी यांनी उपचार घेण्यासाठी मनोज जरांगे यांना विनंती केली.

मात्र, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. अंतरवाली सराटी येथे श्री. जरांगे यांना भेटून पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात समर्थक येत आहेत. विविध संघटना, राजकीय नेते आदी या ठिकाणी येऊन पाठिंबा देत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT