Bamboo Farming Agrowon
ताज्या बातम्या

Bamboo Farming : बांबू लागवडीसाठी शासकीय योजनेचा लाभ घ्या

Government Scheme : जिल्हा परिषद व पंचायत समिती भोर, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे भोर तालुक्यातील देवघर येथे आयोजन केले होते.

Team Agrowon

Pune News : ‘‘बांबू आपल्या भागाचे सोने आहे. याकडे शेतकऱ्यांनी जास्त लक्ष देऊन शासनाच्या योजनेतून बांबू लागवड करून आर्थिक उत्पन्नवाढीचा प्रयत्न करावा,’’ असे आवाहन महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. गिरिराज यांनी केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती भोर, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे भोर तालुक्यातील देवघर येथे आयोजन केले होते.

या वेळी मार्गदर्शन करताना श्री. गिरिराज बोलत होते. या वेळी प्रकल्प संचालक शालिनी कडू, मनरेगा अधिकारी स्नेहा देव, अधिकारी किरणकुमार धनवडे, गटविकास अधिकारी विजय धनवटे, कृषी विस्तार अधिकारी शिवराज पाटील, डी. एस. चांदगुडे, ग्रामसेवक सुहास गायकवाड, महेश लोहार, अनिल अभंग, पोपट कांबळे, महेश कालेकर तसेच निगुडघर देवघर व भागातील सरपंच उपस्थित होते.

श्री. गिरिराज म्हणाले, ‘‘बांबू लागवडीचे ११७ प्रस्ताव पंचायत समितीकडे आले असून, त्यातील १४ शेतकऱ्यांना ९ लाख १० हजार रकमेला प्रशासकीय मान्यता दिली आहे.’’

शंभर रोपांसाठी तीन वर्षांत ६८ हजार अनुदान

प्रशासनाकडून बांबू लागवडीसाठी १०० रोपांसाठी तीन वर्षांत ६८ हजार रुपयांचे अनुदान आहे. रोपांऐवजी कंद लागवडीस परवानगी देण्यात आली असून, अल्पभूधारकासाठी आठ-अ उताऱ्यांत जास्त नावे असणाऱ्या शेतकऱ्यांचे संमतीपत्र जोडता येईल, त्यामुळे बांबू लागवड सोयीची होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT