Dr. Rajesh Deshmukh Agrowon
ताज्या बातम्या

Minor Mineral Mining : अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करा

वाळू, माती, मुरूम यासारख्या गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी,’’ अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

Team Agrowon

आपटाळे, ता. जुन्नर ः ‘‘जुन्नर तालुक्यातील पोटखराब क्षेत्र (Potkharaba Land) जास्तीत जास्त लागवडीखाली येण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी. याबरोबरच वाळू, माती, मुरूम यासारख्या गौण खनिजाचे (Miner Mineral) अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी,’’ अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

जुन्नर तहसील कार्यालयात डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय कामकाजाबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर, तहसीलदार रवींद्र सबनीस, निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे, निवडणूक नायब तहसीलदार सुधीर वाघमारे, शांताराम किर्वे, शोभा भालेकर, विद्या नांगरे, व्यंकटेश भोसले आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले,‘‘तालुक्यातील रोजगार हमी योजने अंतर्गत सर्व तालुकास्तरीय विभागांनी तातडीने कामे सुरू करावीत. शेतकऱ्यांच्या पोटखराब क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात रूपांतरित करण्याची प्रकरणे तसेच ‘४२ ड’ची प्रकरणे तत्काळ मार्गी लावावीत.’’

या प्रसंगी डॉ. देशमुख यांनी तहसील कार्यालय, रेकॉर्ड रूम, गोडाऊन आदींची पाहणी केली. तहसील कार्यालयाच्या आवारात केलेल्या सुधारणांचे कौतुक डॉ. देशमुख यांनी या वेळी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकरी प्रश्नी राजू शेट्टी आक्रमक, २३ मार्चला मुंबई -गोवा महामार्ग रोखणार

Unseasonal Rain: अर्धापुर तालुक्यात वादळी पावसासह गारपीट

Unseasonal Rain: ऐन पाडव्याला सोलापुरात बळीराजाच्या डोळ्यात पाणी

POCRA Scheme: पोकरा अंतर्गंत वैयक्तीक लाभाच्या घटकांसाठी साडेदहा हजारांवर अर्ज

Forest Fire: सिन्नर तालुक्यातील वनसंपदा नष्ट

SCROLL FOR NEXT