Minor Mineral : गौण खनिजाची चोरी; नऊ वाहने जप्त

धुळे तालुक्यात महसूल यंत्रणेची धडक कारवाई; तस्करांचा उच्छाद
Minor mineral
Minor mineral Agrowon
Published on
Updated on

धुळे : धुळे तालुक्यात गौण खनिजाची (Minor Mineral) अवैधरीत्या चोरी करणाऱ्यांविरुद्ध सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे ग्रामीणच्या तहसीलदार गायत्री सैंदाणे यांच्या पथकाने धडक कारवाई केली. त्यात तहसीलदारांनी नऊ वाहनांसह गौणखनिज जप्त केले. या कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले.

धुळे तालुक्यातील रावेर व परिसरात, तसेच अन्यत्र सर्रास गौण खनिजाची चोरी होत आहे. त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. यासंदर्भात तक्रारी झाल्यावर तहसीलदार सैंदाणे यांनी बेकायदा गौण खनिजाची चोरी व वाहतूक बंद होण्यासाठी कारवाईची पावले उचलली. त्यांनी तलाठ्यांसोबत शुक्रवारी (ता. ४) दुपारी न्याहळोद, दह्याणे, पुरमेपाडा शिवारात धडक कारवाई केली.

यात गौण खनिजासह नऊ वाहने ताब्यात घेतली. त्यात न्याहळोदमधील दोन ट्रॅक्टर, पुरमेपाड्याला तीन ट्रॅक्टर, तसेच मिनी डंपर, बल्हाणेतील दोन डंपर, पोकलॅण्डचा समावेश आहे. रावेरसह दह्याणे- बह्याणे शिवारात तस्करांनी उच्छाद मांडला आहे.

Minor mineral
Crop Advisory : हरभरा पीक सल्ला

गौण खनिजाचे मोजमाप करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची सूचना श्रीमती धोडमिसे यांनी यंत्रणेला दिली आहे. त्यानुसार तहसीलदार सैंदाणे, मंडळाधिकारी सी. यू पाटील, महसूल यंत्रणेचे किरण कांबळे, दिलीप चौधरी, विजू पाटील, बांगर, सागर नेमाने, समाधान शिंदे, तलाठी महेंद्र पाटील, समाधान पाटील, भूषण चौधरी, स्वप्नील शिंदे, अतुल टरले, संदीप गवळी, गजानन सोनवणे यांच्या पथकाने कारवाई केली. दह्याणे बेकायदेशीर खाणीचे खोदकाम झाल्याने मोजमाप होईल. या प्रकरणी शासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर दोषींवर वसुलीची कारवाई होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com