Water Agrowon
ताज्या बातम्या

Takari Upasa Yojana : ताकारी योजनेचे पाणी ४४ किलोमीटरपर्यंत पोहोचले

कडेगाव, खानापूर, पलूस व तासगाव तालुक्यांना लाभ

Team Agrowon

वांगी, जि. सांगली ः कडेगाव, खानापूर, पलूस व तासगाव तालुक्यांतील शेतीसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या ताकारी उपसा योजनेच्या (Takari Upsa Scheme) यंदाच्या पहिल्या आवर्तनाचे पाणी पाच दिवसांत कालव्याच्या ४४ किलोमीटरवर नेवरी-आंबेगा दरम्यान असलेल्या वितरिका क्र. ३८ पर्यंत पोहोचल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.

ताकारी लाभक्षेत्राती शेतकऱ्यांच्या मागणीनुसार योजनेचे पहिले आवर्तन सहा डिसेंबरला सुरू झाले. परंतु टप्पा १ वरून टप्पा दोनवर पाणी वाहणाऱ्या वाहिनीचा व्हॉल्व्ह फुटल्याने गळती सुरू झाली होती. त्यामुळे तत्काळ पंप वाढविणे अशक्य होते. युद्धपातळीवर व्हॉल्व्ह दुरुस्ती करून रविवारपासून (ता. ११) ‘ताकारी’चे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यावरील आठ पंप सुरू केलेत. पाणी आवश्यक दाबाने व गतीने पुढे सरकत आहे. मुख्य कालव्यातील या पाण्याने सोमवारी (ता. १२) नेवरी-आंबेगावदरम्यान ४४ किलोमीटरपर्यंत मार्गक्रमण केले आहे. त्याचवेळी टप्पा तीनवरील तीन पंप सुरू करून सोनहिरा खोऱ्यातील गावांना पाणी दिले आहे. टप्पा चारवरील एक पंप सुरू करून सोनसळ, शिरसगाव या गावांना बंदिस्त वाहिनीमधून पाणी दिले आहे.

ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात जमिनीतील नैसर्गिक पाणी अल्पकाळ टिकत असल्याने अवकाळी पावसानंतर महिनाभरात ताकारी योजना सुरू करावी लागली. ‘पाटबंधारे’च्या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद देऊन येथील सिंचनक्षेत्र वाचविल्याची भावना शेतकऱ्यांत आहे. सोडलेल्या पाण्याचा उपयोग कडेगाव, खानापूर, पलूस व तासगाव तालुक्यांतील बारमाही क्षेत्रासह वाढलेल्या रब्बी हंगामातील शेतीला होणार आहे.

ताकारी योजनेचे पाणी सुरुवातीपासून सर्व पोटकालव्यांवरील शेवटच्या शेतकऱ्याला भरपूर मिळेपर्यंत संबंधित वितरिका बंद होणार नाही. शेतकऱ्यांनी या पाण्याचा जपून वापर करावा व सिंचनक्षेत्र वाढवावे.

- राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी योजना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT