Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : पीक नुकसान पाहण्यासाठी यंत्रणा बांधावर

अतिवृष्टीमुळे अकोट तालुक्यात उमरा, अकोलखेड मंडलांमध्ये खरीप पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत.

टीम ॲग्रोवन

अकोला ः अतिवृष्टीमुळे अकोट तालुक्यात उमरा, अकोलखेड मंडलांमध्ये खरीप पिकांचे (Kharip Crop) भवितव्य धोक्यात आले आहे. झालेल्या नुकसानीचे (Crop Damage) पंचनामे सुरू झाले आहेत. गुरुवारी (ता.१३) नुकसानग्रस्त भागात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह (Aarif Shah) व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन आढावा घेतला. तर दुसरीकडे तातडीने पंचनामे करून भरपाई (Crop Insurance) मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी या वेळी व्यक्त केली.

अकोट तालुक्यातील बोर्डी, धारुळ रामापूर, कासोद शिवपूर, सुकळी, राहणापूर, उमरा, अकोलखेड, अकोली जहागीर, वस्तापूर, पोपटखेड, मोहाळा, लाडेगाव, जितापूर, पिंप्री, शहापूर या भागांत मॉन्सूनपूर्व लागवड झालेल्या कपाशीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

खरीप हंगामात अति पावसामुळे या वर्षी उडीद व मूग पिकाने आधीच दगा दिलेला आहे. गेल्या वर्षात कापसाचा चांगला भाव मिळाल्याने या वर्षी शेतकऱ्यांनी लागवडीत दुपटीने वाढ केली. मात्र आता सातत्याने पाऊस होत असल्याने कापूस उत्पादकांची निराशा झाली आहे.

गेल्या हंगामात एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन मिळाले होते. यंदा इतकेही उत्पादन मिळण्याची शक्यता दिसत नाही. कापसाची प्रत घसरली आहे. सोयाबीन पिकाचेही सलग तिसऱ्या वर्षी नुकसान झालेले आहे.

ऐन काढणीच्या काळातच हा पाऊस होत असल्याने सोयाबीन उत्पादक हतबल झालेला दिसत आहे. या वर्षी खरीपातील प्रमुख पिके असलेल्या कपाशी आणि सोयाबीनला लावलेला खर्चाचा ताळमेळ बसणे अशक्य दिसत आहे.

वेचणीचा कापूस खराब झाला. सोयाबीन काळवंडले, कोंब निघाले. कृषी अधीक्षकांनी भेट दिली तेव्हा तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे, कृषी सहायक बैरागी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat GR : अतिवृष्टीबाधितांना ४८० कोटी रुपयांच्या निधी वाटपास मान्यता; शासन निर्णय जारी

Crop Loan: खरीप हंगामात केवळ ३५ टक्के पीककर्ज वाटप

Ethanol Blending: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण २७ टक्क्यांपर्यंत वाढवा, साखर उद्योगाची मागणी

Cotton Procurement: कापूस खरेदी नोंदणी जलद व पारदर्शक करण्यासाठी ‘ॲग्रीस्टॅक पोर्टल’चा वापर करावा: पणन मंत्री जयकुमार रावल

Dust Pollution: धुळीमुळे श्वसनाच्या आजारात वाढ

SCROLL FOR NEXT