Crop Insurance
Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा परताव्यासाठी ‘स्वाभिमानी’चा ठिय्या

टीम ॲग्रोवन

यवतमाळ ः महागाव तालुक्‍यासह जिल्ह्यातील तब्बल ७ हजारांवर शेतकरी पीक विम्याच्या भरपाईपासून (Crop Insurance) वंचित आहेत. खरिपात झालेल्या अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतकरी आधीच पिचला आहे. त्यात हक्‍काची विमा भरपाई (Crop Damage Compensation) मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याची दखल घेत विमा भरपाईची रक्‍कम खात्यात त्वरित जमा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला.

महागाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पीकविमा भरपाई संदर्भात ‘स्वाभिमानी’ने निवेदन पाठविले. त्यासोबतच मागणीच्या पूर्ततेसाठी तहसिल कार्यालयात शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.१३) ठिय्या आंदोलनही करण्यात आले. खरिपाच्या सुरुवातीला पावसाने उघडीप दिली. त्यानंतर जून महिन्यापासून मात्र पाऊस थांबता थांबत नव्हता. अतिवृष्टीचा फटका बसल्याने पिकाची उत्पादकता प्रभावित झाली. शासनाने मदत जाहीर केली आणि त्याचे वितरणही झाले. परंतु हक्‍काची वीमा भरपाई मात्र शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही.

महागाव, पुसद, दिग्रस, उमरखेडसह जिल्हाभरात सुमारे सात हजारांवर शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत. कृषी विभागाने संयुक्‍त पंचनाम्याअंती शेतकऱ्यांना भरपाई दिली असताना वेगवेगळे कारण सांगत वीमा कंपनीकडून मात्र विमा भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शेतीमालाच्या नुकसानीच्या तुलनेत अत्यल्प विमा परतावा मिळाल्याचीही बाब उघडकीस आली आहे. अशा शेतकऱ्यांना भरीव परतावा देण्याची मागणी स्वाभिमानीने केली आहे.

शेतीपंपांना १२ तास दिवसा वीजपुरवठा व्हावा, प्रोत्साहन अनुदानाची रक्‍कम खात्यात जमा करावी, अशा मागण्यांही आंदोलकांनी या वेळी केल्या. ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव, शिवानंद राठोड, सचिन उबाळे, प्रमोद अडकीने, दीपक हाडोळे, विशाल पवार, जगदीश राठोड, विनोद पवार, शिरीष बोरुळकर, श्रीराम चव्हाण, जयसिंग राठोड आदी आंदोलनात सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT