Sugarcane Farmers agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Farmers : ४०० चा दुसरा हप्ता द्या अन्यथा साखर वाहतूक अडवणार, 'स्वाभिमानी'चा साखर कारखानदारांना इशारा

sandeep Shirguppe

Kolhapur Sugar Factories : गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रूपये तातडीने द्या, अन्यथा गाठ स्वाभिमानीशी आहे, असे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज (ता.०२) कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांवर ढोल बजावो आंदोलन करून जागर करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकर मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना सावकर मादनाईक म्हणाले की, गेल्या वर्षभरात साखरेला व उपपदार्थास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर मिळाले आहेत. साखर कारखान्यांना यामधून चांगल्या पध्दतीने नफा मिळालेला आहे.

वाढलेल्या महागाईमुळे औषधे, खते, बि बियाणे, किटकनाशके यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वाढलेल्या या महागाईमुळे शेतकयांचे कंबरडे मोडले आहे. तोंडावर दसरा आणि दिवाळी आल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे सणासुदीला पैसे नाहीत.

यामुळे कारखान्याकडून तातडीने दुसरा हप्ता ४०० रूपये खात्यावर जमा करण्यात यावे. या बाबत आपणास २ ऑक्टोंबर पर्यत मुदत देण्यात आली होती. आज अखेर आपण सदरचा हप्ता जमा न केल्याने ढोल ताशा आंदोलन करून आज कारखानदारांना जागं करण्याचे काम करत असल्याचे सावकार मादनाईक म्हणाले.

उद्यापासून कारखान्यातून बाहेर पडणारी साखर वाहतूक अडवून उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असेही ते म्हणाले. तसेच दसऱ्याच्या अगोदर आमच्या हक्काचे ४०० रूपये प्रतिटन न दिल्यास तुमची दिवाळी गोड होणार नाही. असा इशारा सावकर मादनाईक यांनी दिला.

यावेळी गुरूदत्त, जवाहर, पंचगंगा व शरद यासह राजाराम कारखान्यावर ढोल बजाओ आंदोलन करून ४०० रूपये तातडीने देण्याची मागणी करण्यात आली. याचबरोबर सांगली जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांवर स्वाभिमानीच्यावतीने निवेदन देत आंदोलन करण्यात आले. यावेळी विठ्ठल मोरे, वैभव कांबळे, सागर संभूशेटे, शैलेश आडके, सचिन शिंदे, बंडू पाटील, भिमगौंडा पाटील, सागर मादनाईक, वासू भोजणे, विश्वास बालिघाटे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT