Swabhimani shetkari sanghatna Agrowon
ताज्या बातम्या

Onion Export : पैठण येथे ‘स्वाभिमानी’ची निदर्शने

Swabhimani Shetkari Sanghatna : केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कावर ४० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे सरकारने कांदा निर्यातीचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा यासह विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पैठण येथे जोरदार आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhaji Nagar News : कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा कांदा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून जाणार आहे. गेल्या वर्षभरात कांद्याला मातीमोल दर मिळाला, तेव्हा सरकारने डोळेझाक केली. मात्र आता कांद्याच्या दरात काहीशी वाढ होत असल्याचे जाणवताच केंद्राने हा निर्णय शेतकऱ्यांच्या माथी लादला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ पैठण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा युवा अध्यक्ष माउली मुळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. २३) निदर्शने करण्यात आली.

या वेळी माजी आमदार संजय वाघचौरे यांनी निदर्शने आंदोलनात सहभागी होवुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. केंद्र सरकारच्या धरसोड धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने फटका बसतो आहे.

कांद्याला चांगला दर मिळण्याची स्थिती निर्माण झाली, की कधी निर्यातबंदी तर कधी निर्यात शुल्कात भरमसाट वाढ करून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवायचे हे धोरण केंद्र सरकार सातत्याने राबवीत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलक शेतकरी यांनी केला.

या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष माउली मुळे, पवन शिसोदे, सुभाष नवथर, शिवाजी साबळे, बद्री बोंबले, विजय कुलकर्णी, श्री. उगले शिंदे, किशोर सांगळे, सचीन बोडखे, सोनू औटे, प्रकाश पवार, विनोद औटे, अमोल औटे, संभाजी काटे, रवींद्र आंबले, डॉ. गुलदाद पठाण, अमोल कर्डिले, मनोज दौंड, उद्धव मापारी, शेलुकर, अंकुश काळे, दिलीप बनकर, शिशुपाल औटे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidarbha Heat Wave: मराठवाड्यात पाऊस, विदर्भात उष्णतेचा इशारा; मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज

Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2026: कोल्हापूरच्या राजकारणाला उकळी, गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरु, ठराव दाखल करण्याची तारीख ठरली

Water Scarcity: सांगलीत खानापूर तालुक्यात सहा गावांत पाणीटंचाई

Hatnur Dam Water Release: ‘हतनूर’मधून विसर्ग; अनेक गावांना दिलासा

Summer Crop Sowing: हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी पिकांच्या पेरणीत ६ हजार ७०२ हेक्टरने घट

SCROLL FOR NEXT