Agrowon
ताज्या बातम्या

Andolan : कालवे दुरुस्ती निधीवरून ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

कालव्यांच्या देखभाल दुरुस्ती निधीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.२८) सिंचन मंडळ कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर व कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

Team Agrowon

अकोला ः कालव्यांच्या देखभाल दुरुस्ती निधीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.२८) सिंचन मंडळ कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर (Ganesh Khumkar) व कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

याबाबत खुमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हयात रब्बी हंगाम पूर्व कालवे साफसफाईसाठी जो निधी मिळतो तो दोन हंगामापासून मिळालेला नाही. हा निधी नसल्याने कालव्यांची व्यवस्थित दुरुस्ती झालेली नाही. देखभाल दुरुस्ती कामांसाठी सुधारित प्रपन सूची पाठवण्यास स्थानिक कार्यालयाकडून झालेल्या टाळाटाळीमुळे अकोला जिल्ह्याला तत्काळ देखभाल दुरुस्ती निधी उपलब्ध होऊ शकला नाही. या मुद्द्यावर खुमकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सिंचन मंडळ अधीक्षक अभियंता कार्यालयात आंदोलन छेडले. यापूर्वी २१ नोव्हेंबरला निधीची मागणी केली होती. त्यावर विदर्भ विकास पाटबंधारे महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी अतिरिक्त प्रपन सूची पाठवा, निधी देण्यास प्रयत्न केले जातील असे स्पष्ट केले होते. अधीक्षक अभियंता कार्यालयातून टाळाटाळ झाल्याचा आरोप खुमकर यांनी केला आहे.

आंदोलनाच्या इशाऱ्याबाबत दिलेल्या निवेदनाला विभागाने मंगळवारी (ता.२७) पत्र दिले. परंतु त्या पत्रातही  कोणती कामे आणि किती निधी पाठवला हे काहीच समजत नसल्याची बाब खुमकर यांनी
स्पष्ट केली.  जिल्ह्याला हक्काचा निधी मिळणे गरजेचे होते. याला दोषी असलेल्यांविरुद्ध आक्रमक भूमिका स्वाभिमानीच्या आंदोलकांनी घेतली. आंदोलनात मंगेश गावंडे, मोहन काळे, रमेश डगवाल,
आकाश टिपरे, शुभम खराटे, प्रथमेश मावळे, संदीप काळमेघ आदी सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT