ajit pawar press conference agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar : अजित पवार यांच्यासह नऊ जणांविरोधात निलंबन याचिका

Latest News Ajit Pawar : धक्कातंत्राचा वापर करत अचानक राजभवनावर उपमुख्यत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्यासह अन्य नऊ मंत्र्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबन याचिका दाखल केली आहे.

Team Agrowon

Mumbai News : धक्कातंत्राचा वापर करत अचानक राजभवनावर उपमुख्यत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्यासह अन्य नऊ मंत्र्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबन याचिका दाखल केली आहे. रविवारी (ता. २) रात्री १२ वाजता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली असून त्यावर तातडीने सुनावणी घेऊन निर्णय द्यावा, अशी मागणीही पक्षाने केली आहे.

‘अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार पवार यांना आणि मला संपर्क करत आहेत. त्यांनी सांगितले आहे की, त्यांना धोक्याने तेथे नेले होते. ज्या नऊ आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तेथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला.

शिस्तभंग समितीच्या शिफारशीवरून कार्यवाही

पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ सदस्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांना कोणतीही कल्पना न देता पक्ष धोरणाच्या, हिताच्या विरोधात कारवाया करत शपथ घेतली ती त्यांची कृती बेकायदा असून पक्षाला अंधारात ठेवल्याने याबाबत एका सदस्याने शिस्तभंग समितीकडे तक्रार केली त्यानंतर समितीच्या सूचनेवरून त्या नऊ जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वारे दाखल केली. तसेच विधीमंडळ सचिवालयातही त्याची प्रत दिली आहे.’

तत्काळ सदस्यत्व रद्द करावे

या सदस्यांचे सदस्यत्व तत्काळ रद्द करावे, अशी मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्षांना ई-मेल आणि व्हॉट्सॲपवरद्वारे आणि त्यांच्या आय मेसेजवरदेखील पाठवण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

सदस्यत्व रद्द करण्याच्या याचिकेवर लवकरात लवकर बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंतीही केली आहे. याशिवाय निवडणूक आयोगालाही याबाबत कळवण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

प्रोफेशन आणि पर्सनलमध्ये गल्लत नाही

राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘अजित पवार माझे मोठे भाऊ आहेत. पक्षकार्य हे माझे प्रोफेशन आहे तर नातेसंबंध हे पर्सनल आहे. या दोन्हींची मी कधीच गल्लत करत नाही.’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT