Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : हिंगोली जिल्ह्यात दीड लाख पूर्वसूचनांचे सर्वेक्षण प्रलंबित

परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान

Team Agrowon, निवृत्ती पाटील

अॅग्रोवन वृत्तसेवा
हिंगोली ः अतिवृष्टी, (Heavy Rainfall) सततच्या परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे (Kharif Crop) मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीम बाबीअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा (Crop Insurance) भरपाईसाठी विमा कंपनीकडे (Insurance Company) ३ लाख ७ हजार ५६६ पूर्वसूचना तसेच काढणीपश्‍चात नुकसानीच्या २३ हजार ९५८ पूर्वसूचना दाखल केल्या आहेत. त्यापैकी ५९ हजार ४८४ पूर्वसूचनांचे सर्वेक्षण झाले असून, १ लाख ४२ हजार ९९० पूर्वसूचनांचे सर्वेक्षण प्रलंबित आहे.

हिंगोली जिल्ह्यात खरिपात ३ लाख ४६ हजार ५३ हेक्टरवर पेरणी झाली. जिल्ह्यातील ३ लाख ८० हजार ५०५ शेतकऱ्यांनी २ लाख २२ हजार ८५१ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. सोयाबीनसाठी २ लाख ४६ हजार ४६४ शेतकऱ्यांनी १ लाख ८६ हजार ७४४ हेक्टर, कपाशीसाठी २० हजार ७६६ शेतकऱ्यांनी ६ हजार ७२० हेक्टर, तुरीसाठी ५२ हजार ६०४ शेतकऱ्यांनी १५ हजार १८२ हेक्टरसाठी विमा घेतला आहे.

जिल्ह्यातील एकूण ३ लाख ७ हजार ५६६ पूर्वसूचना दाखल केल्या आहेत. त्यापैकी एकापेक्षा अधिक वेळा दाखल केलेल्या ३९ हजार ६८५ पूर्वसूचना, दुष्काळ या बाबीअंतर्गत दाखल केलेल्या ७५९ पूर्वसूचना, उशिरा दाखल केलेल्या २४ हजार १९१ पूर्वसूचना, नुकसान नमूद न केलेल्या ४० हजार ४५७ पूर्वसूचना अशा एकूण १ लाख ५ हजार ९२ पूर्वसूचना विमा कंपनीकडून नाकारण्यात आल्या आहेत.

तालुकानिहाय पूर्वसूचना स्थिती
तालुका एकूण पूर्वसूचना सर्वेक्षण पूर्ण सर्वेक्षण प्रलंबित
हिंगोली ४७९२५ १०२४८ २१२३३
कळमनुरी ६५८०६ १४२०२ २६८३९
वसमत ७२२८९ ११४०५ ३६८१२
औंढा नागनाथ ६८९६४ १०५२१ ३४९८७
सेनगाव ५२५८२ १३१०८ २३११९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PDCC Bank: अतिवृष्टीग्रस्तांसाठी पीडीसीसी बँकेची १ कोटी २६ लाखांची मदत

Sugarcane Cultivation : नांदेड विभागात एक लाख ८१ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Flood Livestock Loss : वाहून गेलेल्या पशुधनाला बाजारभावाप्रमाणे मदत द्या

Farmer Protest: कर्जमाफीशिवाय मागे हटणार नाही; २८ ऑक्टोबरला राज्यातील शेतकरी-मजूरांचा नागपूरात मोर्चा, बच्चू कडूंचा एल्गार

Diwali Clay Diyas : परराज्यातील पणत्यांची बाजारपेठांमध्ये आवक

SCROLL FOR NEXT