Fertilizer Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer : डीएपीच्या नावावर ‘प्रॉम’, ‘पीडीएम’ खतांचा पुरवठा

चांदूर बाजार तालुक्यात शेतकऱ्यांच्या सतर्कतेने उधळला डाव

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती : प्रॉम (फॉस्फेट रिच अॉर्गेनिक मॕन्यूअर) आणि पीडीएम (पोटॕश डिराईव्हड फॉर्म मोलॕसेस) (PDM) खताची डीएपीच्या नावावर विक्री करण्याचा गोरखधंदा शेतकऱ्यांनीच उधळून लावला.

चांदूरबाजार तालुक्यातील जसापूर येथील या घटनेत पुरवठा करण्यात आलेले खत रामतीर्थ येथील पातुर्डे कृषी सेवा केंद्रातील असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

चांदूर बाजार तालुक्यातील जसापूर येथे महिनाभरापूर्वी काही युवकांनी शेतकऱ्यांना घरपोच डीएपी खताचा पुरवठा करणार असल्याचे सांगितले होते.

त्यासाठी आगाऊ नोंदणी करून ठराविक रक्कमेची मागणी करण्यात आली. शेतकरी प्रदीप बंड यांच्याकडूनही त्यांनी नऊ पोत्यांकरिता ३ हजार रुपये आगाऊ स्वीकारले.

मात्र हा सारा प्रकार बनवाबनवीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर बंड यांनी उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते यांना माहिती दिली. दरम्यान, शुक्रवारी (ता.६) छोट्या मालवाहू वाहनातून खत घेऊन काही युवक खत देण्यासाठी गावात आले.

सातपुते यांनी त्याची पडताळणी केली. त्यावेळी  प्रॉम आणि पीडीएम खत दिले जात असल्याचे लक्षात आले. खताच्या बॅगवर ५०० ते ६०० रुपये किंमत असताना शेतकऱ्यांकडून प्रत्येक पोत्यासाठी १५०० रुपये घेतले होते.

कृषी अधिकाऱ्यांनी खत जप्त करून त्याचे नमुने घेत ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणी कारवाई करू, अशी माहिती सातपुते यांनी दिली.

चांदूरबाजार तालुक्यात ४० बॕगांचा पुरवठा


चांदूरबाजार तालुक्यात ४० बॕग खतांचा पुरवठा करण्यात आला. हे खत दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थ गावच्या पातुर्डे कृषी सेवा केंद्रातील असल्याची बाब प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.

रोशन पातुर्डे हे या कृषी सेवा केंद्राचे संचालक असून त्यांची शेतकरी कंपनी असल्याचा  खुलासा होताच दर्यापूर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तडकाफडकी रामतीर्थ गाठत संबंधितांची झाडाझडती घेतल्याची माहिती आहे.

त्यामुळे आता याप्रकरणी पुढील काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT