Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : नुकसानीचे सरसकट पंचनामे करा

जिल्हयात अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त एकही शेतकरी, नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही.

टीम ॲग्रोवन

सोलापूर : जिल्हयात अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे (Heavy Rainfall) मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त एकही शेतकरी, नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही. यासाठी सरसकट पंचनामे करावेत, अशा सूचना महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe patil) यांनी दिल्या.

श्रीपूर (ता.माळशिरस) येथील पांडुरंग सहकारी साखर कारखानाच्या ३२ व्या गळीत हंगाम शुभारंभ व आसवनी प्रकल्प उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री विखे- पाटील बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार प्रशांत परिचारक, संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, पांडुरंग साखर कारखान्याचे संचालक उमेश परिचारक, धैर्यशील मोहिते पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, प्रांताधिकारी ज्योती कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. शिवपूजे उपस्थित होते.

पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले, की जिल्हयात अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतपिकांसह शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन या नुकसानीचे पंचनामे करण्याला प्राधान्य द्यावे, सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून तसा अहवाल शासनाला तत्काळ सादर करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara DCC Bank Election : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आठ ठराव रद्द

Cattle Feed Shortage : अहिल्यानगर जिल्ह्यात चार महिने पुरेल एवढाच चारा उपलब्ध

Yavatmal Drought : अन्यथा नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही

Cotton Pink Bollworm: गुलाबी बोंड अळीचा कापसावर वाढता धोका

Loan Waiver Scheme : कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या यादीत ४० हजार शेतकऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT