Sugarcane Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Cultivation : जळकोट तालुक्यात अकराशे हेक्टरवर ऊस

जळकोट तालुका हा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जात होता. उसाचे एखादे टिपरू आणायचे म्हणजे फरकटत फिरावे लागत होते.

Team Agrowon

जळकोट ः तालुक्यात गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा तब्बल ११०० हेक्टरवर उसाची लागवड (Sugarcane Cultivation) करण्यात आली आहे.

जळकोट तालुका हा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जात होता. उसाचे एखादे टिपरू आणायचे म्हणजे फरकटत फिरावे लागत होते. कै.चंद्रशेखर भोसले, माजी आमदार मनोहर पटवारी (Former MLA Manohar Patwari), आमदार संजय बनसोडे (MLA Sanjay Bansode) यांच्या प्रयत्नामुळे तालुक्यातील बारा साठवण तलाव व शंभरहून अधिक पाझर तलाव झाले.

त्यामुळे सिंचनाचे (irrigation) प्रमाण वाढले एकेकाळी तालुक्यात शंभर हेक्टरवर ऊस नव्हता आता पाणी उपलब्ध असल्यामुळे आकराशे हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे.

तालुक्यात तीस किलोमीटर अंतरावर विकास टु, कारखाना चालु झाला. ऊस वेळेवर जाण्याची सोय उपलब्ध झाली. उसाला चांगला भाव मिळू लागला त्यामुळे ऊस लागवडीकडे शेतकरी उत्साहात वळला.

दरम्यान तालुक्यात माळहिप्परगा, रावणकोळा, चेरा, जंगमवाडी, सोनवळा, डोंगरगाव आदींसह बारा साठवण तलाव उपलब्ध आहेत. गेल्यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे साठवण तलावाची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुले ऊस क्षेत्र वाढले आहे.

तालुक्यापासून जवळ कारखाने सुरू आहेत. उसाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे मेहनत कमी आहे. आणि पैसे वेळेवर मिळत असल्यामुळे ऊस लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहेत. बँरेजेसचे काम पूर्ण झाल्यानंतर ऊसाची लागवड अजून दुपट्ट होईल.
बाळाजी केंद्रे, शेतकरी पाटोदा बु. ता. जळकोट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: राज्य सरकारचे अतिवृष्टीच्या मदतीचे दर अखेर जाहीर; शासन निर्णय जारी, काय आहेत मदतीचे दर?

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट, अॅव्होकॅडो, मसाला पिकांना ‘एकात्मिक फलोत्पादन’ मधून अनुदान

Jowar Cultivation : अतिवृष्टीमुळे ज्वारीच्या कोठारात हरभरा, करडई

Onion Market : निर्यात धोरणाचा, बाजार हस्तक्षेपाचा कांदा दरावर विपरीत परिणाम

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी तालुकास्तरावर करा

SCROLL FOR NEXT