Student Protest Agrowon
ताज्या बातम्या

Agri Student Protest : महात्मा फुले कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचा ‘कॅण्डल मार्च’

शासकीय व खासगी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांत पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे, उत्तीर्ण झालेले व पीएचडी करणारे विद्यार्थी आंदोलनात सहभागी आहेत.

Team Agrowon

Agri Student Protest नगर ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१-२०२२ ला तत्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावेत, यासह विविध मागण्यांसाठी कृषी अभियांत्रिकी (Agriculture Engineering) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू केलेल्या आंदोलनाला शुक्रवारी (ता.१०) सतरा दिवस झाले आहेत. गुरुवारी (ता. ९) रात्री या विद्यार्थ्यांनी कॅण्डल मार्च काढून आंदोलन (Student Protest) केले.

महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेतर्फे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठासह डॉ. बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी या चारही कृषी विद्यापीठांच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी २५ जानेवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू केले.

शासकीय व खासगी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांत पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे, उत्तीर्ण झालेले व पीएचडी करणारे विद्यार्थी आंदोलनात सहभागी आहेत.

शुक्रवारी (ता.१०) आंदोलनाचा सतरा दिवस होता. गुरुवारी रात्री विद्यार्थ्यांनी कॅण्डल मार्च काढून निषेध व्यक्त केला. सरकार दखल घेत नसल्याने विद्यार्थ्यांनी या वेळी संताप व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: मॉन्सून सोमवारपासून परतीच्या प्रवासावर

Coconut Farming: कापूस पट्ट्यात नारळाचे यशस्वी उत्पादन

Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; लातूर, नांदेडमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’

Ethanol Policy : इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसा मिळतो; केंद्रीय मंत्री जोशींचा दावा

Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांसाठी ५७४ कोटींची मागणी

SCROLL FOR NEXT