Maratha Reservation Protest Agrowon
ताज्या बातम्या

Maratha Reservation Protest : जाळपोळ, निषेध, रास्ता रोको; मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून महाराष्ट्रात तीव्र पडसाद

sandeep Shirguppe

Maratha Reservation News : मागच्या ४ दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात पोलिसांनी मराठा आरक्षण आंदोलकांवर केलेल्या लाठी हल्ल्याचे तीव्र पडसाद राज्याच्या अनेक जिल्ह्यांत उमटत आहेत. मागच्या ३ दिवसांपासून राज्य सरकारच्या विरोधात रास्ता रोको, निषेध मोर्चे, बंद, अशी आंदोलने करण्यात आली. दरम्यान बीड, जालना, परभणी या जिल्ह्यात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने जाळपोळीच्या घटना घडल्या. पुणे, बारामती, सातारा, कोल्हापूर यासह अन्य जिल्ह्यात जोरदार आंदोलन झाले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये बंद पुकारण्यात आला

छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक येथे शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेच्यावतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि जालना इथं झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आले. यावेळी काहीकाळ रास्ता रोको करण्यात आला होता.

लातूर बंद

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात बंद पाळण्यात आला. दरम्यान उजनी येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला. औसा तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उजनी येथे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे.

कोल्हापुरात उद्या बंदची घोषणा

दरम्यान आज (ता. ०४) सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने जवाब दो आंदोलन ठेवण्यात आले होते. यावेळी ११ च्या सुमारास दसरा चौकात मराठा समाजाचे लोक जमण्यास सुरूवात झाली. यानंतर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये ‘जवाब दो, जवाब दो, महाराष्ट्र सरकार जवाब दो’, ‘एक मराठा, लाख मराठा’,‘या जनरल डायरचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’ अशा घोषणांनी दसरा चौक दणाणून सोडला.

यानंतर सकल मराठा समाजाचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी या आंदोलनामागील भूमिका सांगितली. अमानूष लाठीचार्ज करणाऱ्या जिल्हा पोलिस अधीक्षक अन् उपअधीक्षक यांना निलंबित करा, या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उद्या, मंगळवारी कोल्हापूर शहर बंदचे आवाहन केले. त्याला सर्वांनीच पाठिंबा दिला.

सांगलीत बससेवेवर परिणाम

मराठा समाजाचे आंदोलन सुरू असल्याने सातारा बंदच्या पार्श्वभूमीवर सांगली कडून कराड, सातारा, पुणे, मुंबई बस सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान काही काळाने बससेवा पूर्ववत झाल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

औंढा नागनाथमध्येही बंद

जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ औंढा नागनाथ शहरात आज (ता.०४) कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. औंढा येथील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदविला. सकल मराठा समाजाच्या वतीने औंढा नागनाथ येथील बस स्थानका समोर एकत्र येऊन निदर्शने करून शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा काढण्यात आला.

यावेळी औंढा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. या मोर्चामध्ये सकल मराठा समाज उपस्थित होता. औंढा नागनाथ शहरातील विविध चौकामध्ये पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT