Eknath Shinde  Agrowon
ताज्या बातम्या

Eknath Shinde : ‘मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील’

सामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करत सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे,’’ असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (ता.१९) दिले.

Team Agrowon

नागपूर : ‘‘मराठा समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. सामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करत सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे,’’ असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (ता.१९) दिले.

मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. स्वामी जितेंद्रनाथ महाराज हे या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दटके, राजे डॉ. मुधोजी भोसले, राजे संग्रामसिंह भोसले, श्रीकांत शिंदे, शिरीष राजेशिर्के, नरेंद्र मोहिते, दिलीप धंद्रे, दीपक देशमुख आदी या वेळी उपस्थित होते. मराठा समाजाच्या वतीने १२ मागण्यांचे निवेदन राजे डॉ. मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

शिंदे म्हणाले, ‘‘मराठा समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईसाठी शासन सज्ज आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध कर्ज योजना, तसेच शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना सुरु केल्या आहेत. विद्यार्थी- विद्यार्थिनींना साह्य करण्यात येत आहे.’’

‘मराठा तरुण

नोकरी देणारा व्हावा’

‘‘मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांद्वारे भांडवल दिले जात आहे. मराठा युवकांचा प्रतिसाद अत्यंत सकारात्मक आहे. अनेकांचे उद्योग यशस्वीरीत्या सुरू आहेत. मराठा समाजातील तरुण हा नोकरी देणारा व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे,’’ असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एकीकडे शासन कायदेशीर लढाई लढत आहे. त्यासोबतच उद्योजकतेला वाव देणाऱ्या योजना, वसतिगृह योजना, निर्वाह भत्ता योजनांद्वारे मराठा युवक युवतींना न्याय देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Import : अफगाणिस्तानातून लसणाची आयात

Sharad Pawar : ईव्हीएम, पैशाने आमचा घात केला

Natural Farming : नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास मंजुरी

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी १२ टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू

SCROLL FOR NEXT