Agricultural Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : बुलडाणा जिल्ह्यात कृषिपंपांची सक्तीची वीजतोडणी थांबवा

सध्या वीज वितरण कंपनीमार्फत शेतीपंपाची वीजतोडणी केली जात असून, ही सक्तीची वीजबिल वसुली आणि शेतीपंपावरील वीज खंडित करण्याची कारवाई तत्काळ थांबवावी, अशी मागणी शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Team Agrowon

देऊळगावराजा, जि. बुलडाणा : सध्या वीज वितरण कंपनीमार्फत शेतीपंपाची वीजतोडणी (Electricity Connection) केली जात असून, ही सक्तीची वीजबिल वसुली आणि शेतीपंपावरील वीज (Agriculture Pump Electricity) खंडित करण्याची कारवाई तत्काळ थांबवावी, अशी मागणी शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या बाबत महावितरणला निवेदन दिले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक वीज वितरण कार्यालयात जात अधिकाऱ्यांसोबत शेतकरी व वीज ग्राहकांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. या वेळी तालुका प्रमुख दादाराव खार्डे, शहर प्रमुख अजय शिवरकर, युवा सेना तालुकाप्रमुख प्रकाश बस्सी, माजी उपनगराध्यक्ष पवन झोरे यांनी सक्तीच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या विजपंपावरील विद्युत पुरवठा खंडित केला जात असल्याची बाब निदर्शनात आणून दिली.

या कारवाईमुळे अनेक शेतकऱ्यांची रब्बी पिके धोक्यात आली आहेत. अशा वेळी सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी. महावितरणच्या उपविभागीय कार्यकारी अभियंत्यांना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. वीज ग्राहकांवर होणारा हा अन्याय तत्काळ थांबवावा, शेतीपंपावरील वीज कुठल्याही परिस्थितीत खंडित करू नये, अन्यथा डफडे बजाव व ताला ठोको आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Sale Fraud: ‘पॉस’मधील गैरप्रकारांकडे सहा वर्षांपासून दुर्लक्ष

Illegal Raisin Import: बेकायदा बेदाणा आयातदारांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा

Sugar Industry: साखर निर्यात, इथेनॉलबाबत केंद्राने धोरण स्पष्ट करावे

Drip Irrigation Subsidy: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ठिबकसाठी अनुदान

Soybean Seeds Sale: सोयाबीन बियाण्याची ३२ हजार क्विंटलवर विक्री

SCROLL FOR NEXT