Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : गुलाबी थंडीसाठी वाट पहावी लागणार

राज्यात पहाटे थंडी आणि दुपारी चटका ही स्थिती अनुभवायला मिळत आहे. किमान तापमानात हळूहळू घट होणार असली तरी गुलाबी थंडीसाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्यात पहाटे थंडी (Cold Weather) आणि दुपारी चटका (Heat) ही स्थिती अनुभवायला मिळत आहे. किमान तापमानात (Minimum Temperature) हळूहळू घट होणार असली तरी गुलाबी थंडीसाठी (Cold Winter) आणखी वाट पहावी लागणार आहे. रविवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्रात (Wheat Research Center) १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

नोव्हेंबर महिन्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता यापूर्वीच हवामान विभागाने वर्तविली आहे. यातच राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर किमान आणि कमाल तापमानात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. सध्या किमान तापमान ११ ते १८ अंशांच्या दरम्यान आहे. त्यामुळे पारा आणखी घसरून गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी काहीशी वाट पहावी लागणार आहे.

दरम्यान, पहाटे गारठा असून, धुके, दव दिसून येत आहे. राज्यात किमान तापमान १३ ते २३ अंशांच्या दरम्यान आहे. तर कमाल तापमान ३० ते ३५ अंशांच्या आसपास टिकून आहे. आज (ता. १४) राज्यात हवामान कोरडे राहून, तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

चौकट ----

कमी दाब क्षेत्र अरबी समुद्राकडे

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तामिळनाडू, पद्दुचेरी, केरळवरून प्रवास करून अरबी समुद्राकडे सरकले आहे. ही प्रणाली रविवारी (ता. १३) उत्तर केरळ आणि लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रात होती. आग्नेय बंगालच्या उपसागरात १६ नोव्हेंबरपर्यंत नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.६ (१३.३), जळगाव ३२.० (१७.०), धुळे ३१.० (१३.५), कोल्हापूर ३१.७ (१७.८), महाबळेश्वर २५.१(१३.४), नाशिक २९.४ (१४.३), निफाड ३०.२ (१३.०), सांगली ३२.३(१६.९), सातारा ३०.३(१५.०), सोलापूर ३३.८ (१७.७), सांताक्रूझ ३४.६(२३.२),

डहाणू ३४.५ (२१.१), रत्नागिरी ३६.३ (२१.०), औरंगाबाद २९.८ (१४.२), नांदेड ३२.८ (१७.०), उस्मानाबाद - (१६.४), परभणी ३०.९ (१५.५), अकोला ३२.२ (१८.५), अमरावती ३१.८ (१७.१), बुलडाणा २९.४ (१७.४), ब्रह्मपुरी ३२.४ (१६.१), चंद्रपूर ३०.४ (१७.६), गडचिरोली ३२.०(१५.६), गोंदिया ३०.८(१६.०), नागपूर ३०.९ (१५.०), वर्धा - (१६.६), वाशीम ३२.६ (१७.०), यवतमाळ ३१.० (१५.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT