Fish Market Agrowon
ताज्या बातम्या

Silver Paplet : सिल्व्हर पापलेटचा आता राजेशाही थाट

Fish Market : सिल्व्हर पापलेटला ‘राज्य मासा’ दर्जा देण्याची घोषणा नुकतीच मत्स्य व्यवसाय मंत्रालयाने केली. सिल्व्हर पापलेटला खवय्यांकडून नेहमीच मागणी असते.

महेंद्र दुसर

Alibaug News : सिल्व्हर पापलेटला ‘राज्य मासा’ दर्जा देण्याची घोषणा नुकतीच मत्स्य व्यवसाय मंत्रालयाने केली. सिल्व्हर पापलेटला खवय्यांकडून नेहमीच मागणी असते. आता राज्‍य मासा घोषित केल्‍याने किमतीही वाढल्‍या आहेत. रायगडमध्ये सिल्व्हर पापलेटसाठी काही बंदरे विशेष प्रसिद्ध आहेत. घाऊक व्यापारी आता या बंदरांत उतरलेल्या मालाची खरेदी करून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये पाठवू लागले आहेत.

श्रावण सुरू असतानाही स्थानिक बाजारात मासळीचा तुटवडा भासू लागला आहे. खवय्यांकडूनही सिल्वर पापलेची मागणी वाढली आहे. किंमत वधारल्‍याने मासळी बाजारात सिल्व्हर पापलेटचा थाटही वाढला आहे. पापलेटला स्थानिक पातळीवर सरंगा म्हणून ओळखले जाते. सिल्वर पापलेट चविष्‍ट आणि पौष्टिक म्‍हणून ओळखले जाते.

पापलेट हे व्यावसायिक दृष्ट्या कोकणातून सर्वाधिक निर्यात होणारे आणि खवय्यांच्या पसंतीस उतरलेले सागरी अन्न आहे. बोर्ली, धरमतर, बोडणी, जीवना बंदरात पापलेटची आवक जास्त होते. या बंदरांतील पापलेट राज्यातील जिल्ह्यांत निर्यात केले जातात. राज्य मासा जाहीर झाल्यानंतर सिल्व्हर पापलेटच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार असल्‍याचे मत्स्यव्यवसाय विभागाने सांगितले.

पापलेटच्या उत्पादनात सातत्याने घट

बेसुमार मासेमारीमुळे १९८० पासून पापलेटच्या साठ्यामध्ये घट होत आहे. १९७० च्या दशकात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर साधारण ८,३१२ टन पापलेट मिळायचा. यामध्ये घट होऊन २०१८ पर्यंत ४,१५४ टन पापलेट मिळत असल्याची आकडेवारी मत्स्यव्यवसाय विभागाकडून मिळाली आहे.

बाजारपेठेतील पापलेटच्या मागणीसह मासेमारीच्या पद्धतीतील बदलामुळे लहान आकाराच्या पापलेटची संख्या कमी झाली आहे. भारताच्या वायव्य भागातील पापलेट माशांच्या साठ्यावर विपरित परिणाम झाल्‍याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

पापलेटला राज्य मासा म्हणून दर्जा मिळाल्याने या मत्स्य प्रजातीच्या अधिवासाचे संरक्षण करण्याचा प्रयत्‍न आहे. मच्छीमारांचे किनारपट्टीवरील समुदाय, स्वयंसेवी संस्था व सरकारी एजन्सी यासारख्या विविध भागधारकांना सहभागी करून पर्यावरणाशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी एक सहयोगी व्यासपीठ तयार करण्यात येईल.
- संजय पाटील, सहायक उपायुक्त, मत्स्यव्यवसाय, रायगड
किनारपट्टीवरील पर्यावरण आणि मासेमारी अर्थव्यवस्थेत सिल्व्हर पापलेटला विशेष स्थान आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांकडून पापलेटची मागणी आवर्जून होते. श्रावण सुरू असताना पापलेटचे भाव चढेच आहेत. खवय्ये खास पापलेटवर ताव मारण्यासाठी कोकणात येतात. पापलेटला राज्य मासा म्हणून घोषित केल्यामुळे मागणी आणखी वाढली आहे; मात्र त्‍यामुळे पापलेट ही मत्‍स्‍यप्रजाती नामशेष होऊ नये यासाठी त्‍यांचे संवर्धन व मच्छीमारांमध्ये प्रबोधन होणे गरजेचे आहे.
- रूपेश चेवले, हॉटेल व्यावसायिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bt Cotton Launch: कपाशी सरळ वाणांच्या बीटी बियाण्यांचे लोकार्पण

Chaskaman Dam: चासकमान धरणातून रब्बीसाठी आवर्तन सुरू

Manikrao Kokate: मंत्री कोकाटे यांची दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा कायम

Loan Repayment Notice: मृत शेतकऱ्याच्या नावे कर्ज परतफेडीची नोटीस

Agriculture Technology: कामगंध सापळ्यातील नवकल्पना

SCROLL FOR NEXT