ST Employee Agrowon
ताज्या बातम्या

ST Employee Strike : सणासुदीत एसटी कामगार संपावर ; १३ सप्टेंबरपासून राज्यभरात बेमुदत उपोषण करणार

ST Bus News : मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मार्गावरील बससेवा थांबविली. दरम्यान, सणासुदीच्या तोंडावर एसटी कामगारांनीही आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Swapnil Shinde

ST Employee Protest : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी १३ सप्टेंबर पासून राज्यभरात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सणसुदीत पुन्हा लाल परीची चाके थांबणार आहेत. या उपोषणाच्या पार्श्भूमीवर एसटी महामंडळाचे सामान्य प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड यांनी जे कर्मचारी या उपोषणात सहभागी होतील, अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व विभाग नियंत्रक यांना दिले आहेत.

दीड वर्षांपूर्वी एसटी कामगारांनी एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरात संप पुकारला होता. यावेळी राज्य सरकाराने कामगारांच्या अनेक मागण्या मान्य केल्या होत्या. त्यानंतर कामगारांनीनी संप मागे घेतला होता. परंतु, सरकारने मान्य केलेल्या कामगारांच्या मागण्यांची पूर्तता अद्यापही केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी १३ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे.

तत्पूर्वी ११ व १२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत, जर या दोन दिवसात सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक निर्णय न घेतल्यास १३ सप्टेंबरपासून राज्यभरात एसटी कामगार संघटनेतर्फे उपोषण पुकारले जाणार आहे.

एसटी महामंडळाने महागाई भत्ता, घरभाडे आणि वार्षिक वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. आम्ही मागणी केलेल्या मागण्यांची अद्याप पूर्तता न केल्याने आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आमचे ५० हजार सभास्द असून, आम्ही उपोषण सुरू केल्यावर एसटी महामंडळातर्फे जी कारवाई होऊन त्या कारवाईला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे.
संदीप शिंदे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT