Kharif Season agrowon
ताज्या बातम्या

Kharif Season : यंदाचा खरिप हंगाम धोक्यात, तुरळक पावसाने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

Kharif Crop : कोल्हापूरच्या पश्चिम भागातून पावसाला जोरदार सुरुवात झाली. हळूहळू संपूर्ण जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात जोरदार पावसाने झोडपून काढले.

Team Agrowon

Kharif Season Kolhapur : मागच्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने काल(ता.२५) जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होण्यासह पिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु मागच्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने अनेक पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

दरम्यान काल(ता.२५) कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून थांबलेल्या पावसाने काल थोडासा दिलासा दिला. दरम्यान श्रावणात अधून- मधून येणाऱ्या जोरदार सरीही या महिन्या पहायला मिळाल्या नाहीत. उन्हाचा तडाख्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांसह पिके करपण्याची भिती होती.

कोल्हापूरच्या पश्चिम भागातून पावसाला जोरदार सुरुवात झाली. हळूहळू संपूर्ण जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे भात, भुईमूग, सोयाबीनसह इतर पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. माळरानातील पिकांना पाण्याअभावी आणि पावसाअभावी मरगळ आली होती. आजच्या पावसाने ही पिके आणखी मोठा पाऊस होईपर्यंत तग धरू शकणार आहेत. जिल्ह्यातील गगनबावडा, शाहूवाडी, करवीर, कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस झाला.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले या तालुक्यात समाधानकारक पाऊस नसल्याने खरीप पिके अडचणीत येऊ लागली आहेत. पिकांना पाणी नसल्याने पीक माना टाकत आहे. त्यांना वाचवण्यासाठी बळीराजा धडपड करताना दिसत आहे.

वळीव, मृग नक्षत्र वाया गेल्याने शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात पेरणी केली. हातकणंगले तालुक्यात सुमारे १० हजार हेक्टर सोयाबीन पिकाची लागवड आहे; तर सुमारे ९ हजार ५०० हेक्टरवर भुईमूग पीक आहे.

जिल्ह्यात पंचगंगा नदी आठवडाभर इशारा पातळीवर असली तरी हातकणंगले तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. पेरण्या उशिरा कराव्या लागल्या. यातच आता पावसाने पुन्हा ओढ दिल्याने पिके कशी जगवायची, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy : कृषी यांत्रिकीकरण अनुदानाला मान्यता; २०० कोटी रुपयांच्या वाटपाचा मार्ग मोकळा

Eknath Shinde Dasra Melava Speech : पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वी मदत देणार; एकनाथ शिंदेंनी दिला शब्द

Drone Farming: ड्रोनद्वारे फवारणीचे तंत्र; आधुनिक शेतीचे नवीन मॉडेल

Rain Alert Maharashtra : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

Farmers Death: धक्कादायक वास्तव! भारतात दर तासाला एक शेतकरी जीवन संपवतोय, सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात

SCROLL FOR NEXT