Food Processing Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Agri Entrepreneurship : विद्यार्थिनींसाठी कृषी उद्योजकतेमध्ये विशेष संधी ः सारिका पाटील

सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये नोकरीमधील संधी कमी होत आहेत. यामुळे कृषी पदवीधारक विद्यार्थिनींसाठी कृषी उद्योजकतेमध्ये विशेष संधी उपलब्ध आहेत.

Team Agrowon

Satara News सातारा ः ‘‘सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये नोकरीमधील संधी कमी होत आहेत. यामुळे कृषी पदवीधारक (Agriculture Graduate) विद्यार्थिनींसाठी कृषी उद्योजकतेमध्ये (Agri Entrepreneurship) विशेष संधी उपलब्ध आहेत.

स्वत:वर उद्योजकतेचे संस्कार करून घेत शेती व शेती निगडित व्यवसायांची कास धरणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन कृषी व कुक्कुटपालन (Poultry Farming) पर्यटनामधील उद्योजिका सारिका पाटील यांनी व्यक्त केले.

कृषी महाविद्यालय, कराड येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सातप्पा खरबडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. ज्योती वाळके, वसतिगृह कुलमंत्री डॉ. सतीश बुलबुले, सहायक कुलसचिव सुहास हराळे, सहायक नियंत्रक रवींद्र चोथे, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. आधुनिक महाराष्ट्र निर्मितीमध्ये स्त्रियांचे मोठे योगदान आहे.

प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. महिलांना ज्या संधी उपलब्ध होत आहेत. त्याचा यथार्थ उपयोग करीत महिला नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत आहेत. कृषी शिक्षणामध्येही महिलांची संख्या वाढत असल्याचे डॉ. खरबडे यांनी नमूद केले.

विद्यार्थिनी प्रतिनिधी ज्योती ढमढेरे हिने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ज्योती वाळके यांनी केले, तर सूत्रसंचालन आशना सय्यद हिने केले. शिवानी चव्हाण हिने उपस्थितांचे आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दरात दबाव कायम, मका दरात मंदी, ढोवळी मिरची आवकेत चढ-उतार, शेपू दरात चढ-उतार, मोसंबी बाजारात नरमाई

Uddhav Thackeray: पंचनाम्यासाठी ५ ऑक्टोबरचा मुहूर्त, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या मरणाची वाट बघता का? उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल

Shirala Farmers: शिराळा तालुक्यात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा देण्याची मागणी

Power Shortage: अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे दुष्काळात तेरावा महिना

Loan Waiver List: धुळे जिल्ह्यात साडेतीन हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

SCROLL FOR NEXT