Soybean Farming Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Rate India : शेतकऱ्यांनो सोयाबीनला येणार अच्छे दिन? अन्य देशातील सोयाबीन उत्पादन घटण्याची शक्यता

Soybean Trading : यंदाचा सोयाबीनचा हंगाम सुरू होण्यास काही दिवस बाकी आहेत. परंतु अद्यापही सोयाबीनचा दर पाच ते साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल आहे.

sandeep Shirguppe

Soybean Production : अल् निनोमुळे देशातील अनेक राज्यात क्षमतेपेक्षा पाऊस कमी झाला. यामुळे अनेक राज्यातील खरीप पिकांची स्थिती चिंताजनक बनली आहे. दरम्यान सोयाबीन, भात, यासह अनेक कडधान्यांच्या पिकात घट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान मागच्या सोयाबीनसह अन्य पिकांचे उत्पादन चांगले झाल्याने दर पडले होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांना कमी दरात सोयाबीन विकण्याची वेळ आली होती. यंदा मात्र उत्पादनच कमी होणार असल्याने सोयाबीनला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.

यंदाचा सोयाबीनचा हंगाम सुरू होण्यास काही दिवस बाकी आहेत. परंतु अद्यापही सोयाबीनचा दर पाच ते साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल आहे. मात्र, प्रमुख उत्पादक देश अमेरिका आणि ब्राझीलमध्ये कमी पावसाचा फटका बसून, सोयाबीनचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे यंदा भारतीय सोयाबीनच्या मागणी, दरात देखील वाढ होण्याची शक्यता सोयाबीन ट्रेडर्सकडून वर्तवली जात आहे.

अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा जास्त उत्पादन भारतात घेतले जाते. दरम्यान अमेरिका तसेच ब्राझीलमधून होणारा सोयाबीनच्या पुरवठ्यामुळे भारतीय सोयाबीनला दर कमी मिळतो यामुळे पुरवठा दरावर प्रभाव पडत असतो. आता नवीन हंगाम तोंडावर असतानाच सोयाबीन बाजारभाव मात्र अद्यापही दबावाखाली आहे.

या हंगामात अमेरिकेमधील सोयाबीन पीक कमी निघणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. याही देशांनाही कमी पावसाचा फटका बसल्याने सोयाबीन पिकाचे उत्पादन घटणार आहे. यातूनच आतापासूनच अमेरिकेत सोयाबीनचा दर तेजीत आला आहे. याचदरम्यान, पामतेलानेदेखील दरात उसळी घेतली आहे. याचादेखील फायदा सोया तेलाला होत आहे.

सध्या सोयाबीन, सोयापेंड वायदे तेजीत आहेत. परंतु, देशातील बाजारभाव पाहिले, तर मात्र सोयाबीनचे दर हे प्रतिक्विंटल सरासरी साडेचार हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत होते. तसेच उद्योगातून हेच दर ५१०० ते ५२५० रुपयांच्या दरम्यान राहिले आहेत.

तसेच खाद्यतेल बाजारात सूर्यफूल तेलाचे भाव वाढले आहेत. याचा परिणाम हा सोयाबीन दरावर निश्चितपणे होणार आहे. प्रतिकूल नैसर्गिक वातावरणामुळे ब्राझील आणि अमेरिकेतील सोयाबीन पुरवठ्याबाबत चित्र काहीसे सकारात्मक नाही. या दोन्ही देशात सोयाबीन पिकाला कमी पावसाचा फटका बसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Power Supply Disconnection: ३४ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Labour Migration: मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी सोयगावात १२० कामे मंजूर

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी मिळेल?; जाणून घ्या संपूर्ण माहिती

E Crop Survey: आता ऑफलाइन करता येणार ‘ई-पीकपाहणी’: उज्ज्वला पांगरकर

E Crop Survey: ई-पीक पाहणी न झालेल्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT