Kharif Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : लातूर, धाराशिव जिल्ह्यांत ११ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी

Kharif Season 2023 : मराठवाड्यातील लातूर व धाराशिव या दोन जिल्ह्यांत एकूण सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पुढे जाऊन पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Latur News : मराठवाड्यातील लातूर व धाराशिव या दोन जिल्ह्यांत एकूण सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पुढे जाऊन पेरणी झाली आहे. त्यामध्ये लातूर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अपेक्षित पेरणी झाली नाही तर धाराशिव जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पुढे जाऊन पेरणी झाली आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी लातूर व धाराशिव या दोन जिल्ह्यांत मिळून खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ११ लाख ४ हजार १९१ हेक्टर इतके आहे. यामध्ये लातूरमधील ५ लाख ९९ हजार ४५६ हेक्टर, तर धाराशिवमधील ५ लाख ४ हजार ७३५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ५ लाख ८० हजार ३१३ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे.

म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत लातूरमध्ये ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, अजूनही तीन टक्के क्षेत्र पेरणीविना असल्याची स्थिती आहे. दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ५ लाख ३३ हजार ५०९ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०६ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे.

दोन जिल्ह्यातील पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक लातूर धाराशिव

भात ११० ४३

ख. ज्वारी ५०८० ६६४

बाजरी ७१० ८७४

मका २२०१ ६५२३

इतर तृणधान्य ४४५ १०३०

तूर ६३ हजार ८९५ ३१०३६

मूग ४५८१ ५२७७

उडीद २९६८ २५६८३

इतर कडधान्य ४८ ९०२

खरीप भुईमूग २४१ ४३३

तीळ २२१ १२९

कारळ ८० ११

सूर्यफूल १७ ००

सोयाबीन ४ लाख ९२ हजार १४४ ४ लाख ५९ हजार ९४३

इतर गळीतधान्य ३७ ४०२

कपाशी ७५३६ ५५९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabbi Fertilizer Subsidy : रब्बी हंगामासाठी पोषण तत्व आधारित खतांचे अनुदान दर ठरले; केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Soybean MSP Procurement: महाराष्ट्रात १८ लाख टन सोयाबीन खरेदीला मान्यता; मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना ८०० रुपये भावफरक

Montha Cyclone: मोंथा चक्रीवादळामुळे २ दिवस पावसाचा अंदाज; चक्रीवादळ आज रात्रीपर्यंत किनारपट्टीला धडकणार

Fruit Crop Insurance : फळ पीकविमा परताव्याचे वितरण

Crop Damage : पावसाने पिकांची हानी सुरूच

SCROLL FOR NEXT