Chana Sowing
Chana Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Chana Sowing : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हरभऱ्याचा पेरा वाढला

टीम ॲग्रोवन

परभणी ः परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत हरभऱ्याच्या पेरणी (Chana Sowing) क्षेत्राने सरासरी क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. या दोन जिल्ह्यांत २ लाख ३२ हजार ३१७ हेक्टर असताना यंदाच्या (२०२२) रब्बी हंगामात (Rabi Season) शुक्रवार (ता. ९) पर्यंत २ लाख ६७ हजार १८० हेक्टरवर पेरणी (Sowing) झाली आहे. आजवरच्या एकूण रब्बी पेरणी क्षेत्रात परभणी जिल्ह्यात २ लाख ७० हजार ७९४ पैकी २ लाख ६२ हजार १०० हेक्टर (९६.७९ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यात १ लाख ७६ हजार ८९१ पैकी १ लाख ४९ हजार ७०८ हेक्टरवर (८४.६३ टक्के) अशी या दोन जिल्ह्यात मिळून एकूण ४ लाख ११ हजार ८०८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

परभणी जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत ज्वारी, गहू, मका या तृणधान्यांची १ लाख ५४ हजार ८७६ पैकी १ लाख ६ हजार ६९३ हेक्टरवर (६८.८९ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची १ लाख १३ हजार ९० पैकी ७६ हजार ९२२ ६८.०२ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी २७ हजार ९७९ हेक्टर (७१.१८ टक्के) पेरणी झाली आहे.

कडधान्यांचे सरासरी क्षेत्र १ लाख १२ हजार २७२ असताना १ लाख ५४ हजार १२१ हेक्टरवर (१३७.२७ टक्के) पेरणी झाली. त्यात हरभऱ्याची १ लाख १२ हजार १७० असताना १ लाख ५४ हजार ७२ हेक्टर (१३७.२७ टक्के) पेरणी आहे. करडई, जवस आदी गळीत धान्यांची ३ हजार ६४४ पैकी १ हजार २८४ हेक्टरवर (३५.२६ टक्के) पेरणी झाली. त्यात करडईची ३ हजार ३७१ पैकी १ हजार २२३ हेक्टर (३६.२७ टक्के) पेरणी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात तृणधान्यांची ५५ हजार ६७९ पैकी ३६ हजार २२४ हेक्टर (६५.०६ टक्के) पेरणी झाली. त्यात ज्वारीची ११ हजार ६९७ पैकी ६ हजार ७४३ हेक्टर (५७.६५ टक्के), गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी २८ हजार ८९२ हेक्टर (६७.९७ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्यांची १ लाख २० हजार ३६९ पैकी १ लाख १३ हजार १९७ हेक्टरवर (९४.०४ टक्के) पेरणी झाली. त्यात हरभऱ्याची १ लाख १३ हजार १०८ हेक्टर (९४.१४ टक्के) पेरणी झाली. गळीत धान्यांची ८४२ पैकी २८७ हेक्टर (३४.०५ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात करडईची २०५ पैकी २८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय हरभरा पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी २५००० ३५७७६ १४३.१०

जिंतूर ३२९८० ४३५७० १३२.११

सेलू १०६३५ १८६४१ १७५.२७

मानवत ५७९३ ९७२१ १६७.८१

पाथरी ४२५६ ७०२४ १६५..०१

सोनपेठ ६९०३ ८५६० १२४.००

गंगाखेड १११८६ १०७०० ९५.६५

पालम ५७६१ ६२०० १०७.६१

पूर्णा ९६५४ १३८८० १४३.७७

हिंगोली २२०१७ २५३०० ११४.९१

कळमनुरी ३८२४९ २५७१४ ६७.२३

वसमत १९५२४ ११००० ५६.३४

औंढा नागनाथ १६९७८ २७७५० १६३.४५

सेनगाव २३३७९ २३३४४ ९९.८५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT