Bharat Jodo Yatra  Agrowon
ताज्या बातम्या

Bharat Jodo Yatra : शेगावच्या सभेला सोनिया गांधी येणार

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीर सुरु असलेली भारत जोडो यात्रा मंगळवारी (ता.१५) विदर्भात दाखल झाली.

Team Agrowon

वाशीम ः खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीर सुरु असलेली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra ) मंगळवारी (ता.१५) विदर्भात दाखल झाली. पुढील पाच दिवस ही यात्रा वाशीम, अकोला, बुलडाणा जिल्ह्यात प्रवास करून नंतर मध्य प्रदेशात दाखल होईल. दरम्यान शेगावमध्ये शुक्रवारी (ता.१८) होणाऱ्या राज्यातील दुसऱ्या जाहीर सभेला आता सोनिया गांधीही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सभेला मोठी गर्दी उसळण्याची चिन्हे आहेत.

मराठवाड्यातील फाळेगाव येथून सुरू झालेली ही यात्रा सकाळी सीमेवरील कनेरगाव नाक्याच्या पुलावर पोहोचली. यात्रेने पूल ओलांडल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची राष्ट्रवंदना करण्यात आली. त्यानंतर लाल किल्ल्याच्या दरवाजाच्या प्रतिकृतीतून ही यात्रा वाशीम जिल्हयात दाखल झाली. बोराळा हिस्से येथे यात्रेचा दुपारचा मुक्काम होता. तेथेच आदिवासींसोबत बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात ताली. दुपारी वाशीम पोलिस स्टेशन चौकात ''कॉर्नर मिटींग'' चे नियोजन करण्यात आले.

अकोला जिल्ह्यातील यात्रा अशी...

भारत जोडो यात्रा बुधवारी (ता. १६) जांभरून परांडे येथून मालेगावकडे रवाना होईल. दुपारी मुंदडा विद्यालयामध्ये मुक्काम राहील. यानंतर यात्रा मेडशीकडे जाईल. मेडशीमध्ये ‘कॉर्नर मीटिंग नंतर राहुल गांधी हे कारने पातूरला (जि. अकोला) दाखल होतील. तेथे शहाबाबू उर्दू कॉलेजमध्ये त्यांचा मुक्काम नियोजित आहे. गुरुवारी (ता. १७) पातूर येथून ही यात्रा बाळापूरकडे जाईल. शुक्रवारी (ता.१८) सकाळी यात्रा बुलडाणा जिल्ह्यातील शेगावकडे रवाना होईल. तेथे दुपारी चार वाजता सभा होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MahaDBT: ‘डीबीटी’त चुकीची माहिती दिल्यास पाच वर्षे बंदी

Cotton Picking Wages: खानदेशात कापूस वेचणी मजुरीदर स्थिर

Agricultural Loss: नऊ वर्षांत ६४० लाख हेक्टरवरील पिकांचा घास

Air Pollution: वायू प्रदूषणामुळे देशात १८ टक्के मृत्यू

Farmer Issue: कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही सावरू शकत नाही

SCROLL FOR NEXT