Rain
Rain  Agrown
ताज्या बातम्या

Rain : धरण क्षेत्रांत पावसाची काहीशी विश्रांती

टीम ॲग्रोवन

पुणे : जिल्ह्यात आठवडाभरापासून पावसाचा जोर (Rain Intensity) कमी झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात (Dam Catchment Area) पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत. शुक्रवारी (ता.२२) सकाळी आठ वाजपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये पवना धरणांच्या (Pawana Dam) पाणलोट क्षेत्रात १९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे (Department Of Water Resources) झाली आहे.

पावसाने उघडीप दिल्याने धरणांतील आवकेतही काही प्रमाणात घट झाली आहे. तरीही भीमा खोऱ्यातील २६ धरणांमध्ये ४.६० टीएमसी एवढी पाणीसाठा नव्याने दाखल आहे. धरणांत १३७.४१ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुणे शहरांना होणारा पाणीपुरवठा व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची काही प्रमाणात चिंता कमी झाली आहे. पावसाचा जोर ओसरल्याने भात पिकांच्या लागवडी वेगाने सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी लागवडी पूर्ण झाल्या असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

पूर्व भागातील शिरूर, खेड, दौड, इंदापूर, बारामती, पुरंदर भागांतही अधूनमधून ऊन पडत आहे. काही वेळा ढगाळ वातावरणाची स्थिती तयार होत आहे. त्यामुळे सोयाबीन, बाजरी, तूर, मूग, उडीद पिकांना दिलासा मिळत असल्याने वाफसा स्थिती आहे.

जिल्ह्यात शुक्रवारीही (ता.२२) दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी पडत होत्या. नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १६ मिलिमीटर पाऊस पडला. तर टेमघर आणि वडिवळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १० मिलिमीटर पाऊस पडला. तर वरसगाव, पानशेत, कासारसाई, कळमोडी, भामा आसखेड, आंध्रा, शेटफळ, भाटघर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज, चिल्हेवाडी या धरण क्षेत्रांत पावसाचा शिडकावा झाला. तर खडकवासला, चासकमान, नाझरे, वीर, येडगाव, डिंभे, घोड, उजनी, विसापूर या धरण क्षेत्रात पाऊस न पडल्याची नोंद झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT