Farmer Suicide Agrowon
ताज्या बातम्या

Farmers Issue : राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावा

Farmers Problem : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhaji Nagar News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष काशिनाथ वेताळ पाटील यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे.

शेतकरी संघटनेच्या निवेदनानुसार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसानभरपाई अद्यापपर्यंत खात्यावर जमा झाली नाही. शेतकऱ्यांनी भरलेला पीकविम्याचा परतावा अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर आला नाही.

कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जे प्रोत्साहनपर ५० हजार रुपये दिले जाणार होते ते अजूनपर्यंत दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सात-बारावर असलेला कर्जाचा बोजा कमी झाला नाही. वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत गोपीनाथ मुंडे अपघात विमाचा मोबदला मिळाला नसल्याची बाब शेतकरी संघटनेने आपल्या निवेदनात नमूद केली आहे.

नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना किमान सात लाख रुपये देण्याची तरतूद सरकारने करावी. दर पडल्याने शेतकऱ्यांचा कापूस अजून घरात पडून आहे. त्यामुळे कापसाला किमान १४ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर द्यावा. अवकाळी पाऊस व गारपिटीने कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कांद्यावर रोटाव्हेटर फिरवला आहे. त्यांना अजूनही नुकसानभरपाई देण्यात आली नाही.

साखर कारखान्यांनी भाव निश्‍चित न करता शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला नेला. तरी शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे रुपये दर एकरकमी द्यावा. याशिवाय महाराष्ट्रातील संकटात असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पेरणी आधी किमान १५००० रुपये प्रति एकर अनुदान देण्याची मागणीही शेतकरी संघटनेने केली आहे.

शासनाने मागण्याची तत्परतेने दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष कैलास तवार, जिल्हाध्यक्ष काशिनाथ पाटील वेताळ, खुलताबादचे तालुकाध्यक्ष सुनील जाधव, पैठण तालुका अध्यक्ष जगन्नाथ काकडे, फुलंब्री तालुकाध्यक्ष दगडू बोडखे, गंगापूर तालुकाध्यक्ष सोन्या बापू आदींनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ajit Pawar Passes Away: विकासाचा ध्यास घेतलेला दमदार नेता

Local Body Elections: ५९ गटांसाठी २४२ उमेदवार रिंगणात

Ajit Pawar Funeral: 'अजितदादा अमर रहे'; लाखोंच्या उपस्थितीत अजितदादांना अखेरचा निरोप

Farmer Helpline : उत्तर प्रदेश सरकारची शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन; एका कॉलवर मिळणार अनुदान, योजनांची माहिती

Dharashiv Collector Office: शेतरस्त्यांशी संबंधित जीवनरेखा प्रणालीचा गौरव

SCROLL FOR NEXT