Natural Farming  Agrowon
ताज्या बातम्या

Natural Farming : नैसर्गिक शेती प्रक्रियेतून शेती, मानवी आरोग्यविषयक समस्यांचे समाधान

शेतीमधील पशुसहजीवन व शेतीपूरक व्यवसायाचे शाश्‍वत शेतीसाठी महत्त्व याबद्दल मार्गदर्शन करून नैसर्गिक शेती प्रक्रियेतून आधुनिक शेती समस्यांचे समाधान होऊ शकते, असे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रवींद्र काळे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

वाशीम ः शेतीमधील पशुसहजीवन व शेतीपूरक व्यवसायाचे (Agriculture Based Business) शाश्‍वत शेतीसाठी (Sustainable Agriculture) महत्त्व याबद्दल मार्गदर्शन करून नैसर्गिक शेती (Natural Farming) प्रक्रियेतून आधुनिक शेती समस्यांचे (Agriculture Issues) समाधान होऊ शकते, असे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रवींद्र काळे (Dr. Ravindra Kale) यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने मालेगाव तालुक्यातील भौरद येथे नैसर्गिक शेती प्रक्रियेतून शेती व आरोग्य समस्यांचे समाधान विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी अध्यक्ष म्हणून डॉ. काळे बोलत होते. मार्गदर्शक म्हणून कृषी अर्थशास्त्र तज्ज्ञ डॉ. डिगांबर इंगोले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्‍घाटन सत्रात डॉ. काळे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याची माहिती दिली.

महिला शेतकऱ्यांनी जिवाणू निर्मिती क्रियेतून पीक संरक्षणात्मक निविष्ठा निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे सांगत त्यांनी पीक संरक्षणात्मक नियोजनाकरिता निमास्त्र, ब्रह्मास्त्र, दशपर्णी, सोनठास्त्र, ताकास्त्र, सप्तअंकुर इत्यादी बहुविध विधी वापराबद्दल व एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली.

तांत्रिक सत्रात डॉ. इंगोले यांनी महिला शेतकरी बचत गटांचे शेती व्यवसायातील महत्त्व सांगून निसर्ग शेतीची संकल्पना, तत्त्वे व महत्त्व सांगितले.

त्यांनी निसर्ग शेतीसाठी शेतीमधील खर्च कमी ठेवण्याकरिता शेतीमधील उत्पादित बीजामृत, जिवामृत, व्हर्मिवॉश तसेच पशू पीकचक्र आधारभूत शेती प्रणालीबद्दल सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार राम देशमुख यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत मिळणार; कार्यवाही सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

Sheep Goat Care:पावसाच्या खंड काळात शेळ्या-मेंढ्यांची काळजी कशी घ्यावी?

Solapur Water Storage: सोलापूर जिल्ह्यातील तलावांत ठणठणाट; रब्बीची चिंता वाढली

Farmers Protest: कृषिमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

Raiwat Fad Weir: रायवट फड लाभक्षेत्राला पर्यायी पाण्याची मागणी

SCROLL FOR NEXT