Soil Health Agrowon
ताज्या बातम्या

Soil Health : अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविल्यास जमिनीची शाश्‍वतता टिकविणे शक्य

दीर्घ मुदतीय खत प्रयोग तसेच माती परीक्षण व पिकांचा प्रतिसाद यावर आधारित समीकरणांचा उपयोग करून पिकांचे अधिक उत्पादन घेण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः दीर्घ मुदतीय खत प्रयोग (Fertilizer) तसेच माती परीक्षण व पिकांचा प्रतिसाद यावर आधारित समीकरणांचा उपयोग करून पिकांचे अधिक उत्पादन (Crop Production) घेण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे. उपलब्ध नैसर्गिक स्रोतांचा एकत्रित उपयोग करून तसेच विविध शेती पद्धतीचा अंगीकार करून अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविल्यास जमिनीची शाश्‍वतता (Soil Health) टिकविणे शक्य होईल, असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातंर्गत मृद्‌विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागामध्ये तब्बल ३४ वर्षांपासून ज्वारी आणि गहू पीक पद्धतीवर आधारित दीर्घ मुदतीय खतांचा वापर याविषयी ‘अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प’ कार्यरत आहे. या काळसुसंगत व महत्त्वपूर्ण विषयावर विस्ताराने चर्चा होऊन देशपातळीवर या विषयाशी संबंधित विविध पैलूंची उकल व्हावी व संशोधकांमध्ये चर्चा होत भविष्यातील शेतीहित साधण्याच्या हेतूने आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेत अध्यक्ष पदावरून डॉ. गडाख बोलत होते.

कार्यशाळेला भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन विभागाचे उपमहासंचालक डॉ. सुरेश कुमार चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक धवन, भारतीय मृदा विज्ञान संस्थेचे माजी संचालक डॉ. अशोक कुमार पात्रा, भारतीय मृदा विज्ञान संस्थेचे कार्यवाहू संचालक डॉ. ए. बी. सिंग, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे उपस्थित होते.

डॉ. चौधरी यांनी सर्व शास्त्रज्ञांनी देशातील संशोधनाच्या गरजा ओळखून अत्यंत सचोटीने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे. दीर्घ मुदतीय खत प्रयोगासारख्या संशोधनामधून येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे विविध शेती पद्धतींचा विश्‍लेषणात्मक अभ्यास व्हावा. ज्यायोगे पिकांचे अधिक उत्पादन आणि जमिनीची गुणवत्ता यांचा समतोल साधून सदर शेती पद्धतींचा अंगीकार शेतकरी मोठ्या प्रमाणावर करू शकतील, असे सांगितले.

या प्रसंगी डॉ. धवन, डॉ. पात्रा, डॉ. खर्चे, डॉ. सिंघ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण विभागप्रमुख डॉ. एस. एम. भोयर यांनी केले तर प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक डॉ. आर. एच. वंजारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संशोधक विद्यार्थिनी सिंधू राठोड आणि मोहिनी थिटे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino Impact: ‘एल निनो’ सक्रिय, पुढे काय?

Pune Market Committee: तरकारी बाजार रात्री ११ वाजता सुरू करा; आडतदारांची पुणे बाजार समितीकडे मागणी

Tur Moong Minikit: तूर-मूग मिनीकीटसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; पुणे विभागाला १४,३०० किटचे उद्दिष्ट

Fertilizer Hoarding: खतांच्या साठेबाजीवर कृषी विभागाची कारवाई; पुणे विभागात ७ विक्रेत्यांवर गुन्हे

Ahilyadevi Holkar Loan Waiver Scheme: कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी तीन समित्यांची स्थापना

SCROLL FOR NEXT