सांगली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी (Rabi Crop Loan) पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा सहकारी तसेच राष्ट्रीय बँकांना यंदा ८४३ कोटी ७८ लाख रुपयांचे पीककर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट दिले होते.
यात आतापर्यंत केवळ २५७ कोटी ४० लाख रुपयांचे वाटप केले आहे. दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण ३९ टक्के, तर शेतकऱ्यांची बँक (Sangli DCC Bank) असलेल्या जिल्हा बँकेने केवळ १४ टक्के कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीय बँका कर्ज वाटपात प्रथमच आघाडीवर आहेत.
रब्बी हंगामात शेती कामांसाठीशेतकऱ्यांना पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी पीककर्ज वाटपाचे नियोजन शासनस्तरावर केले जाते.
जिल्हा सरकारी बँक, राष्ट्रीय व खासगी व्यापारी बँकांना, तसेच ग्रामीण बँकेला पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले जाते. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकेसह अन्य बँकांना मिळून ८४३ कोटी ७८ लाखांचे पीककर्जाचे उद्दिष्ट दिले आहे.
यापैकी राष्ट्रीय व खासगी व्यापारी बँकांना ३३ हजार ३७७ शेतकऱ्यांना ३७५ कोटी ५२ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. यापैकी त्यांनी दहा हजार ११७ शेतकऱ्यांना १९९ कोटी ८४ लाखांचा म्हणजे उद्दिष्टाच्या ५९ टक्क्यांपर्यंत कर्जपुरवठा केला.
जिल्हा बँक कर्जवाटपात मागे असून सहकारी आणि जिल्हा बँकेला ३९ हजार ५७४ शेतकऱ्यांना ४६६ कोटी ५५ लाखांचे उद्दिष्ट होते. यापैकी आठ हजार ५०८ शेतकऱ्यांना ६७ कोटी १४ लाखांचे कर्जवाटप केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.