Crop Loan : मराठवाड्यात ३३.६० टक्केच कर्जपुरवठा

डिसेंबर संपल्यात जमा असताना अजूनही मराठवाड्यातील कर्जपुरवठा उद्दिष्टाच्या निम्माही झालेला नाही. विविध बँकांनी उद्दिष्टाच्या केवळ ३३.६० टक्केच कर्जपुरवठा केला आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

औरंगाबाद ः मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी वेळेत कर्जपुरवठ्याचे रडत गाऱ्हाणे कायम आहे. डिसेंबर संपल्यात जमा असताना अजूनही मराठवाड्यातील कर्जपुरवठा (Loan) उद्दिष्टाच्या निम्माही झालेला नाही. विविध बँकांनी उद्दिष्टाच्या केवळ ३३.६० टक्केच कर्जपुरवठा केला आहे.

Crop Loan
Crop Loan : मराठवाड्यात कर्जपुरवठा ६१ टक्क्यांवर

यंदाच्या रब्बी हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह, व्यापारी बँका व ग्रामीण बँका मिळून ४३३७ कोटी २८ लाख २० हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी ७४५ कोटी ४० लाख, जालना ४८० कोटी १० लाख, परभणी ६२४ कोटी ८१ लाख, हिंगोली ३७२ कोटी, लातूर ५७९ कोटी ३५ लाख, उस्मानाबाद ५३१ कोटी ७८ लाख, बीड ४४० कोटी तर नांदेड जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या ५६३ कोटी ८० लाख रुपये कर्जपुरवठ्यांच्या उद्दिष्टाचा समावेश आहे.

Crop Loan
मराठवाड्यात केवळ १९ टक्के कर्जपुरवठा

मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत सर्वच बँकांनी मिळून २६ डिसेंबरअखेरपर्यंत १ लाख ६५ हजार ७३२ शेतकऱ्यांना १४५७ कोटी २० लाख २२ हजार कर्जपुरवठा करत ३३.६० टक्के कर्जपुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती केली आहे. ही उद्दिष्टपूर्ती करताना जिल्हा मध्यवर्ती बँका सर्वांत पिछाडीवर असून या बँकांनी मिळालेल्या ९३७ कोटी ४२ लाख ३८ हजार रुपये कर्जपुरवठ्याच्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ११३ कोटी तीन लाख ७५ हजार रुपये कर्जपुरवठा करत १२.६ नक्कीच उद्दिष्टपूर्ती केली आहे. त्यानंतर ग्रामीण बँकेने मिळालेल्या ६१९ कोटी ६७ लाख ८ हजार रुपये उद्दिष्टाच्या तुलनेत १५३ कोटी ५० लाख दहा हजार रुपये कर्जपुरवठा करत २४.७७ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. व्यापारी बँकांनी मिळालेल्या सर्वाधिक २६८० कोटी १८ लाख ७४ हजार रुपये कर्जपुरवठ्याच्या तुलनेत ११९० कोटी ६६ लाख ३७ हजार रुपये कर्जपुरवठा करताना ४२.८३ उद्दिष्टपूर्ती केली आहे.

जिल्हानिहाय कर्जपुरवठा व शेतकरी संख्या

औरंगाबाद

कर्जपुरवठा १८३ कोटी ६३ लाख २९ हजार

शेतकरी २१ हजार २४३

टक्केवारी २४.६४

जालना

कर्जपुरवठा १३५ कोटी ४१ लाख ५८ हजार

शेतकरी १३ हजार ७२०

टक्केवारी २८.२१

परभणी

कर्जपुरवठा ३०७ कोटी ९५ लाख ३२ हजार

शेतकरी ३८८१७

टक्केवारी ४९.२९

हिंगोली

कर्जपुरवठा १५८ कोटी ३४ लाख १९ हजार

शेतकरी २१,४११

टक्केवारी ४२.५७

लातूर

कर्जपुरवठा ८८ कोटी ३८ लाख ८४ हजार

शेतकरी ८०२५

टक्केवारी १५.२६

उस्मानाबाद

कर्जपुरवठा १४१ कोटी ४७ लाख

शेतकरी १२११३

टक्केवारी २६.६०

बीड

कर्जपुरवठा २२५ कोटी ३४ लाख

शेतकरी २३ हजार ३२७

टक्केवारी ५१.२१

नांदेड

कर्जपुरवठा २१६ कोटी ६६ लाख

शेतकरी २७ हजार ७६

टक्केवारी ३८.४३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com