Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : सहा लाख ५८ हजार शेतकऱ्यांचे पीकविमा अर्ज दाखल

Crop Insurance Scheme 2023 : परभणी जिल्ह्यात यंदा आजवर ४ लाख ४ हजार ६३४ शेतकऱ्यांनी पीकविमा अर्ज दाखल केले आहेत.

Team Agrowon

Parbhani News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या २०२३ खरीप हंगामात रविवार (ता. १६) सकाळ पर्यंत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील मिळून ६ लाख ५८ हजार ४३३ शेतकऱ्यांनी पीकविम्याचे अर्ज दाखल आहेत. या शेतकऱ्यांनी एकूण ४ लाख २० हजार २२८ हेक्टरवरील पिके विमा संरक्षित केली आहेत.

परभणी जिल्ह्यात यंदा आजवर ४ लाख ४ हजार ६३४ शेतकऱ्यांनी पीकविमा अर्ज दाखल केले आहेत. त्या कर्जदार ४९९ व बिगर कर्जदार ४ लाख ४ हजार १३५ शेतकरी हे बिगर कर्जदार आहेत. या शेतकऱ्यांनी २ लाख ६१ हजार २४० हेक्टरवरील पिकांसाठी १ हजार ३६३ कोटी १९ लाख रुपये एवढ्या विमा रकमेचे संरक्षण घेतले आहे.

शेतकऱ्यांनी प्रतिअर्ज १ रुपयानुसार ४ लाख ४६ हजार ६१२ रुपये विमा हप्ता भरला आहे. तर राज्य शासनाच्या हिश्शाचा २१० कोटी १० लाख रुपये व केंद्र शासनाच्या हिश्शाचा १७६ कोटी ५ लाख रुपये मिळून एकूण ३८६ कोटी १९ लाख रुपये विमा हप्ता आहे. हिंगोली जिल्ह्यात आजवर २ लाख ५३ हजार ७९९ शेतकऱ्यांनी पीकविम्याचे अर्ज भरले आहेत.

त्यात ८६३ कर्जदार व २ लाख ५२ हजार ९३६ बिगर कर्जदार शेतकरी आहेत.या शेतकऱ्यांनी १ लाख ५८ हजार ९८८ हेक्टरावरील पिकांसाठी ८३८ कोटी ९५ लाख रुपये एवढ्या विमा रकमेचे संरक्षण घेतले आहे.

शेतकऱ्यांनी प्रतिअर्ज १ रुपयानुसार २ लाख ५३ हजार ७९४ रुपये विमा हप्ता भरला आहे. राज्य शासनाच्या हिश्शाचा ८३ कोटी ६० लाख रुपये व केंद्र शासनाच्या हिश्शाचा ६४ कोटी ६४ लाख रुपये मिळून एकूण १४८ कोटी रुपये विमा हप्ता आहे.

अन्यथा गुन्हे दाखल करणार...

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार असणे गरजेचे आहे.

परंतु असे असतानाही जिल्ह्यामध्ये काही शेतकरी नोंदणीकृत भाडे करार नसतानाही दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावरील जमिनीवरच्या पिकांचा पीक विमा काढत असल्याचे आढळून आले आहे.

यापुढे जर अश्या गैरप्रकाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या तर सामूहिक सेवा केंद्र चालक व पीक विमा भरलेले शेतकरी दोन्हीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्याव, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : मुसळधारेने काही तासांत होत्याचे नव्हते

Onion Rate Crisis : कशी फुटेल कांदादर कोंडी?

Fertilizer Stock Mismatch : खत विक्री, प्रत्यक्ष साठ्यात तफावत असल्यास कारवाई

Onion Storage Rot : चाळीस टक्के कांद्याची चाळीतच नासाडी

ICAR Farmer Award : ‘आयसीएसआर’ शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणार

SCROLL FOR NEXT