Banana Export
Banana Export  Agrowon
ताज्या बातम्या

Banana Export : निर्यातक्षम केळीचा देशभरात तुटवडा

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः देशभरात केळीची आवक रखडत सुरू असतानाच आखाती देशांत केळीची मागणी जोमात आहे. पण देशात निर्यातक्षम केळीचा मोठा तुटवडा आहे.

आंध्र प्रदेशात निर्यातीच्या केळीला प्रतिक्विंटल विक्रमी तीन हजार रुपयांपर्यंत दर आहे.

आखातातील इराण, इराक, बहरीन, सौदी अरेबिया आदी भागांत निर्यातीसाठी देशात रोज ५०० कंटेनर केळीची मागणी आहे.

परंतु सध्या रोज फक्त ६५ ते ७० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) निर्यातक्षम केळी देशात उपलब्ध होत आहे.

अनेक वर्षांनंतर डिसेंबर व जानेवारीत ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर केळीला मिळत आहे. देशात केळीची लागवड सर्वत्र अपेक्षेएवढी आहे.

परंतु आवक अल्प आहे. मागील वर्षी केळीला देशभरात डिसेंबर व जानेवारीत सरासरी ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता.

कोविडचा परिणामही दिसत होता. यामुळे मागील हंगामात देशात अनेक शेतकऱ्यांनी डिसेंबर व जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत केळीची आवक होणार नाही, याची काळजी घेतली.

सध्या आंध्र प्रदेशात ३० ते ३५ कंटेनर व राज्यात २८ ते २९ कंटेनर आहेत. सोलापुरातील करमाळा व लगतच्या भागांत २५ कंटेनरची आवक होत आहे.

खानदेशात सध्या रोज सहा ते सात कंटेनर निर्यातक्षम केळी उपलब्ध होत आहे. खानदेशात रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागांतील निर्यातक्षम केळी फेब्रुवारीअखेर उपलब्ध होईल.

आंध्र प्रदेशात डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्चमध्ये केळी येते. तेथे उन्हाळ्यात केळीची आवक नसते. त्यांना चांगले दर मिळत आहेत.

तेथे ताडीपत्री, अनंतपूर या भागांत केळीची आवक होत आहे.
गुजरातमध्ये राजपिपला, कामरेज, आणंद व परिसरात केळी लागवड आहे. तेथेही केळी काढणीसाठी उपलब्ध नाही. मध्य प्रदेशात बडवानी, बऱ्हाणपुरात केळी असते.

तेथेही निर्यातीसाठी केळी उपलब्ध नाही. उत्तर प्रदेशातील गोरखपूर व लगत केळीची जुलैमध्ये आवक असते. सध्या तेथेही केळीची आवक नाही.

तमिळनाडूमधील थेनीमधून केळीची निर्यात होते. तेथेही केळी नाही. राज्यात सोलापूर व जळगावमधून केळीची निर्यात केली जाते.

देशात मुंबई किंवा समुद्र किनारपट्टीलगतच्या भागात केळीला उठाव आहे. स्थानिक भागात केळीला मागणी कमी आहे.

परदेशात मोठी मागणी असल्याने खानदेशातून पिलबाग किंवा खोडवा केळीमधूनही निर्यातीसाठी केळीची मागणी आहे.

केळीचा तुटवडा असल्याने खोडवा केळीची प्रथमच खानदेशातून विविध कंपन्या परदेशात निर्यात करीत आहेत.

खोडवा केळीची प्रथमच निर्यात
वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील संदीप सुभाष पाटील यांच्या खोडवा (पिलबाग) केळी बागेतून नुकतीच २० टन केळीची निर्यात एका कंपनीने आखातात केली आहे.

त्यांना त्यासाठी प्रतिक्विंटल २००० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. आपल्या खोडवा केळीची प्रथमच परदेशात निर्यात झाली.

खानदेशातून प्रथमच दर्जेदार खोडवा केळी परदेशात पाठविली जात असल्याचे शेतकरी संदीप पाटील यांनी सांगितले.

उत्तर भारतात केळीला कमी उठाव आहे. परंतु परदेशात मोठी मागणी आहे. ही मागणी देशातील केळी उत्पादक पूर्ण करू शकत नाहीत, अशी स्थिती आहे.

कारण केळीची आवक कमी आहे. तुटवडा असल्याने परदेशात निर्यातीच्या केळीला ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.
- प्रेमानंद महाजन, केळी व्यापार विषयाचे जाणकार, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT