Akola Electricity Problem News Agrowon
ताज्या बातम्या

Akola News: वीजपुरवठ्यासाठी शिवसेनेचा ‘महावितरण’वर रुमणे मोर्चा

शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करावा, या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेतर्फे येथील ‘महावितरण’च्या कार्यालयावर सोमवारी (ता. १६) मोर्चा काढण्यात आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

Team Agrowon

अकोला ः शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा (Vijpurvatha) करावा, या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेतर्फे (Shivsena) येथील ‘महावितरण’च्या कार्यालयावर सोमवारी (ता. १६) मोर्चा काढण्यात आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे या मोर्चाचे (Morchya) आयोजन करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी केले.

मोर्चात सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड, आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, माजी आमदार संजय गावंडे, गजानन दाळू, माया म्हैसने आदी सहभागी झाले.

शिवसेनेचा हा मोर्चा महावितरण कार्यालयावर नेण्यात आला. शिवसेना कार्यकर्त्यांसह शेतकरी हातात रुमणे घेऊन सहभागी झाले होते. कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करावा आणि पीकविमा योजनेचा योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

कृषिपंपांना विद्युत पुरवठा करताना पूर्व विदर्भात १२ तास दिवसा वीजपुरवठा सुरू करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. त्याच वेळी पश्चिम विदर्भाला या संदर्भात वेगवेगळा न्याय लावण्यात येत आहे. हा भेदभाव का, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला.

रुमणे मोर्चाला जिल्हा परिषद कर्मचारी भवनापासून दुपारी सुरुवात झाली. मोर्चा महावितरण कंपनीच्या विद्युत भवनावर धडकल्यानंतर तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

या सभेला जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, आमदार देशमुख आणि खासदार सावंत यांनी मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धही घोषणाबाजी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Smart Agriculture Campaign: हवामान अनुकूल प्रात्यक्षिकांची आजपासून होणार अंमलबजावणी

Urea Illegal Sale Issue: औद्योगिकीकरणासाठी युरिया विकणाऱ्या दोन रॅकेटचा पर्दाफाश

India Fruit Export: फळनिर्यात दहापट वाढण्याचा अंदाज

Animal Science Course: राज्यात पशुविज्ञान पदविका अभ्यासक्रम सुरू करा

El Nino Impact: ‘एल निनो’चे संकट मर्यादित राहणार: केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

SCROLL FOR NEXT