Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Vote Of Trust: शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

सभागृहाची सदस्य संख्या २८८ आहे. शिवसेनेच्या (Shivsena) एका सदस्यांचा मृत्यू झाल्याने ही संख्या २८७ वर आली. बहुमताची मॅजिक फिगर १४४ आहे. भाजप (BJP) आणि शिंदे (Shinde) गटाकडे असलेल्या सरकारने हा आकडा सहज गाठला.

Team Agrowon

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. १६४ सदस्यांनी सरकारच्या बाजूने मतदान केले. तर ९९ मते विरोधात पडली. विधासभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणे आजही समाजवादी पक्ष व एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मतविभागणीनंतर सरकारने बहुमत सिद्ध केल्याची घोषणा केली.

सभागृहाची सदस्य संख्या २८८ आहे. शिवसेनेच्या एका सदस्यांचा मृत्यू झाल्याने ही संख्या २८७ वर आली. बहुमताची मॅजिक फिगर १४४ आहे. भाजप आणि शिंदे गटाकडे असलेल्या सरकारने हा आकडा सहज गाठला.

सुरुवातीला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर न जाता आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगणारे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar)यांनी आज ठरावाच्या बाजूने मतदान केले. काल (रविवारी) त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदाच्या विरोधात मतदान केले होते.

ठाकरे गटातल्या १६ आमदारांच्या निलंबनाची याचिका

शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bhart Gogavale) यांनी ठाकरे गटाच्या १६ आमदारांच्या निलंबनासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)यांच्याकडे याचिका दाखल केली. या १६ आमदारांना नोटिस देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT